Nojoto: Largest Storytelling Platform

New त्याला समजले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about त्याला समजले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, त्याला समजले.

    PopularLatestVideo

sandy

❤️💛❤️ अनामिका 💛❤️💛 "लैंगिक सतावणीस प्रतिबंध" (Prevention of Sexual Harassment) असे काहिसे नोटिस बोर्डवर वाचले आणि तेवढ्यात आलियाच्या अॉफिसा #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️
अनामिका
💛❤️💛

"लैंगिक सतावणीस प्रतिबंध" (Prevention of Sexual Harassment) असे काहिसे नोटिस बोर्डवर वाचले आणि तेवढ्यात आलियाच्या अॉफिसा

Shubhangi Sutar

नजरेने समजले सारे......

read more
बघता क्षणी सार काही उमगले
नजरेला नजरेची भाषा कळली
अन सार काही नजरेला कळाल 
नजरेने केला इशारा काळजाला....
नको आता तुझे हे भलतेच इशारे
नको ते आता बहाणे... पुरे आता 
तुझ्या डोळ्यांची ही धुंद नशा बेधुंद 
करे मजला तुला बगताच लाजून 
डोळ्यांची पापणी हळूच लवली
बघता क्षणी सार काही 
उमगले अन नजरेतून 
सार काही समजताच
दोन काळीज एक जाहले...♥️

©Shubhangi Sutar नजरेने समजले सारे......

RJ कैलास नाईक

#तिला न समजले

read more
मनातले सारे बोलूनही तिला न समजले 
हिरवळ नसते कोरडी पात्याखाली दवं ओले

प्रेम तिचे लिहताना भरले कितीतरी रकाने
ओळी पाझरल्या परी तिला भाव न कळले

चाळशील सहवासाचे एक एक पान तेव्हा
रुचेल तुजला मन कायम तुझ्यासाठी द्रवले
श्वास तू माझा 
चंद्र आणायची तू साक्षीला नि तुझे ते फितूर तारे
आज का तुझे नभांगण पहायचे का राहिले

कसे विसरु मी तू दिलेले सप्तपदीचे दान
भुरळ नव्हतीच सौंदर्याची फक्त मन पाहिले

तुटणार न कधी तुझा माझा रेशमाचा बंध
श्वास तुझे कधीचे माझ्यात आहेत सामावले
 RJ कैलास #तिला न समजले

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

read more
#ज्याचा त्याचा प्रश्न
चांगल्या माणसांचं सगळं चांगलच होतं, वाईट कधीच होत नाही. पण ते चांगलं होणं हे सामान्य व्याख्येत बसणारं नसतं. घर, बंगला, गाडी, मुलं, नोकरचाकर ही ती व्याख्या नसते. तर चांगलं होण्याची व्याख्या वेगळी असते "त्याच्या" दृष्टीने. ती म्हणजे अशा लोकांना कधी हात पसरावे लागत नाहीत ना पैश्यांसाठी, ना मदतीसाठी. वेळ पडली तर ह्या गोष्टी आपोआप मिळतात त्यांना. तसेच ह्या लोकांच्या चेहऱ्यावर न कितीही कठीण परिस्थिती आली तरी न मावळणारे हास्य आणि समाधान असते ज्याची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. भौतिक सुखाची आस सगळ्यांनाच असते पण भौतिक गोष्टी आत्मिक सुख, समाधान देतीलच असं नाही. पण म्हणून सगळं सोडून भणंग व्हावं का ? तर नाही सगळं असतानाही सगळ्यातून बाहेर पडायची वेळ आली तर दुःखी न होता परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे. खूप कमी लोकांना जमतं हे पण ज्यांना जमतं त्यांचं जगणं सोनं झालेलं असतं. जगात सगळीच माणसं चांगली माणसं असतात पण चांगुलपणा म्हणजे नेमकं काय हे ज्याचं तो ठरवत असतो. अन् त्याचं फळही तसच प्रत्येकाला मिळतं हो की नाही?? शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न.
#गौरीहर्षल
७.६.२०१८ #ज्याचा त्याचा प्रश्न

Sarita Prashant Gokhale

तू कधीचा यशस्वी झालास हे लोकांना समजले का रे? जळण्यात मग्न सारे तुझ्यावर तुला कधी उमजले का रे? स्मिता राजू ढोनसळे #मराठीशायरी

read more
तू कधीचा यशस्वी झालास
हे लोकांना समजले का रे?
जळण्यात मग्न सारे तुझ्यावर
तुला कधी उमजले का रे?

स्मिता राजू ढोनसळे

©Smita Raju Dhonsale तू कधीचा यशस्वी झालास
हे लोकांना समजले का रे?
जळण्यात मग्न सारे तुझ्यावर
तुला कधी उमजले का रे?

स्मिता राजू ढोनसळे

gauri kulkarni

#ज्याचा त्याचा प्रश्न #गौरीहर्षल

read more
#ज्याचा त्याचा प्रश्न
फक्त वय वाढलं म्हणून माणुस मोठा होत नसतो, मोठं होण्यासाठी स्वतःच्या वागण्यात योग्य बदल घडवावे लागतात. स्वतः कडे काही नसताना आणि सगळं असताना तुम्ही इतरांशी कसे वागता यावर तुमचं मोठं असणं ठरतं. पैसा आणि वय ह्या गोष्टी कधीच मोठेपणा देत नाहीत, देतात तो फक्त एक भास असतो तुमच्या अहंकाराला कुरुवाळणारा. वेळ सतत दाखवून देत असते की माणूस म्हणून किती क्षुल्लक आहात तुम्ही. ते ज्याला योग्य वेळी कळतं तो वयाने लहान असूनही आयुष्याच्या शर्यतीत पुढे निघून जातो. बाकी कशातून काय शिकायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. 
#गौरीहर्षल #ज्याचा त्याचा प्रश्न
loader
Home
Explore
Events
Notification
Profile