Nojoto: Largest Storytelling Platform

New खेळू लागला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about खेळू लागला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खेळू लागला.

Related Stories

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज आपल्याला पत्र लिहायचं आहे 2020 या वर्षाला.. #प्रिय2020 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai YourQuoteA #YourQuoteAndMine

read more
प्रिय 2020
तसे पाहता तुला प्रिय बोलणे म्हणजे खूपच हास्यास्पद होईल.
कारण तू इतके काही चांगले कार्य केलेले नाहीस की सर्वांचा प्रिय होशील.
दरवर्षी एक नवे वर्ष येते आम्ही आनंदाने त्याचे स्वागत करतो तसेच तुझेही केले.
पण तूझे आगमन होताच तू तुझ्या नावाप्रमाणे ट्वेंटी ट्वेंटी चा डाव खेळू लागला.
सुरुवातीला तू छान आवडला होतास कारण तुझे नाव ट्वेंटी ट्वेंटी खूप आकर्षक नि थोडे वेगळे वाटत होते.
पण हे नाव इतके वाईट अनुभव देतील असे वाटले नव्हते.
सुरुवातीला शांत भासणारा तू नंतर संकटांची आमच्यावर अशी काही फटकेबाजी केलीस की केव्हा एकदा तू बाद होतोस असे वाटू लागले होते.
सुरुवात संथ होताच काही काळातच कोरोना नामक एकाद्या सर्वोत्तम खेळाडू प्रमाणे दुःखाची,मृत्यूची फटकेबाजी केलीस.
कुणाला म्हणजे कुणाला तू सोडले नाहीस,त्यातच मध्ये वादळ,महापूर,मुसळधार पाऊस ह्यांचे ही आगमन झाले,पण कोरोनाच्या प्रभावात हे पूर्णता विरून गेले.
कोरोना डाव संपत आले असे वाटत असताना पुन्हा एकाद्या कसोटी मालिकेप्रमाणे नवा डाव सुरू केला जो आज पर्यंत चालू आहे.
तु दिलेले अनुभव हे कधीच विसरता येणार नाही असे आहेत,
कित्येक साल आले कित्येक साल येतील पण तू जे घडविले आहे ते कांड कायम लक्षात राहतील. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपल्याला पत्र लिहायचं आहे
2020 या वर्षाला..
#प्रिय2020
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteA

sandy

परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी #story #nojotophoto

read more
 परवा गल्लीतून जात होते. साठीतील एक आजीबाई त्यांच्या नातवंडांत रमल्या होत्या. चार-पाच वर्षांची गोजिरवाणी मुले त्यांच्या अवतीभवती बसलेली. कोणी

Pratik Patil Patu

love poetry खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

read more
खेळ विष-अमृताचा...

तुझ्या आठवणी विषारी
दररोज मारतात
तुझ्याच आठवणी कशा
मज  दुःखात तारतात
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

सुखात तुझी आठवण
तीळ-तीळ तुटते मन
जरी क्षण हे सुखाचे
तरी का भोगते मन ,वेदना विषाच्या
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

प्रतिकूल समयी माझ्या
मी दुःखात बुडताना
अमृतापरी आधार
हा तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

एकाक्षणी त्रास
एकाकी होतो ह्रास
एकांती हव्यास
का तुझ्या आठवणींचा
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा! #love #poetry 
खेळू कसा खेळ मी ,हा विष अमृताचा!

Priya Tambde

छंद लागला #Poetry

read more
छंद लागला

लागला लागला छंद तुझा मला
छंद तुझ्या वेड्या प्रितीचा....,
भान हरपूनी मी माझे
थांग नसे मला माझ्या मनीचा ......!!!

पाहिले जेंव्हा मी तुजला स्वप्नी  
चोहीकडे शोधूनी मी थकले.....,
मिटूनी घेता नयन माझे
मी तुला माझ्या अंतरी पाहिले ....!!!

भिडता नजर नजरेला
बावरूनी मी गेले....,
चेहऱ्यावरील ती बट सावरताना
मी तुझीच होऊनी गेले....!!!

हास्य तुझे निरागस त्यातुनी 
कळला भाव मला तुझ्या मनीचा...,
लागला लागला छंद मला
छंद तुझ्या वेड्या प्रितीचा....!!!
                   ✍️Piu 
कवयित्री- प्रिया तांबडे
ता. मुरुड-अलिबाग , जि. रायगड

©Priya Tambde छंद लागला

Priya Tambde

छंद लागला तुझा #Poetry

read more
mute video

viraj gosavi

अखेर फलक लागला #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile