Nojoto: Largest Storytelling Platform

New संतांचे अभंग मराठी mp3 Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about संतांचे अभंग मराठी mp3 from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, संतांचे अभंग मराठी mp3.

Related Stories

    PopularLatestVideo
b784479ae40796562fe676390e6cc8ad

सैनी गैंगस्टर छोरा SAINI

mp3 vs mp4

mp3 vs mp4 #Love

1,349 Views

b14263a9da74decc380e9058a4b7a3f4

Ganesh B. Ijagaj

माय मराठी! - संजीवनी मराठे 

#krishna_flute

माय मराठी! - संजीवनी मराठे #krishna_flute

48 Views

f9db027fde7f9797e9a8a920a7183730

vinay khedkar

जगाच्या या अफाट गर्दीमध्ये 
आजही शोधतात नयन माझे तुला सर्वामध्ये #मराठी कविता
#प्रेम
#भंग
#आधार
55ba8dc907b9bcdf0d7a3a16869d4c7c

vishnu thore

 आई अभंग अभंग....

आई अभंग अभंग....

4 Love

8fa252bb15b99c3bcfbc868b2fa2af36

अमोल पाटील

 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

5 Love

430afd1b53c1ba4ac5fa7ae97c0c4d71

Archana Pol

मनाच्या तळाशी । अतृप्तीचा डोह।
संसाराचा मोह । सुटो आता ।।१।।

नात्यांच्या गुंत्यांचे। मोह माया बंध 
मना लागो छंद । सत्संगाचा ।।२।।

वासनेचा जाळ । आगीचे मोहळ
देहाचा विटाळ । जळो आता ।।३।।

भावनांचा खेळ। सुखाचे साधन
गुंतलेले मन । व्यापतापी ।।४।।

भक्तीचा ओलावा । हृदयी भिनावा
संतसंग जीवा । जडो देवा ।।५।।

तुझीया भेटीने । उजळो जीवन
हरपावे भान । आनंदाने ।।६।।

©Archana Pol अभंग

अभंग #poem

4 Love

8b14b3bba3ce58e884e54f80908c93fe

vaishali

🙏🏼 मनमंदिरात 🙏🏼

मनमंदिरात | तूच आहे देवा || 
सांग कुठे ठेवा | पुण्याईचा ||१|| 

कर जोडुनिया | तुला विनविते || 
साकडे घालते | पायी तुझ्या ||२|| 

सुखी ठेव साऱ्या | मागते मागणे ||
आहे हे सांगणे | तुजपाशी ||३||

कीर्तनाचा नाद | भक्तीचा सुंगध || 
दरवळे गधं | चोहीकडे ||४||

तूच तार साऱ्या | तोड मोह जाळ ||
साऱ्यांचा संभाळ | कर देवा ||५||

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 # अभंग #

# अभंग #

0 Love

c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

लेखन:- मोहन सोमलकर

©Mohan Somalkar
  #अभंग
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

आषाढी एकादशी
भक्त करिती वारी
वाट चालती पंढरी
आवडीने...!

मोहन म्हणे आता
मिडीयातही देव वसला
प्रत्येक मोबाईलात 
विठुराया हसला......!

तुका पाहती वरुन
पुष्पक विमान
पाठवितो खाली
शिकवितो अभंग या त्यात बसुन.!

असेल आवड 
श्री विठ्ठलाची 
मग कशास बाळगता 
भिती मरणाची...!

निसंदेह, निर्मोही भक्ती करा
स्वतःला पायरीत करा अर्पण 
नका चित्त ठेवा आपुले खेटरात..!


काया ही पंढरी
आत्मा हा विठ्ठल 
दोन्ही निरंतर
हेची सर्व सुख...!


मोहन सोमलकर नागपुर 🚩🚩🚩🎋

©Mohan Somalkar
  #अभंग
9a68e67737a24a5936957f16cee4d050

Shashikant Koli

अभंग....

अभंग.... #Poetry

57 Views

c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

 ऑडिओ- उपक्रम 
अभंग -४ ( एकादशी)
ज्ञानीयाची वाणी॥ आणा आचरणी ॥
आनंद गगनी ॥ धावघेई॥१॥

मनन चिंतन ॥ अध्याय प्रत्येक ॥
पान ऐकऐक॥ करा नित्य॥२॥

मराठीची जाण ॥ भाषेचा सन्मान ॥
बाळगुया मान ॥ सदा मनी॥३॥

आज एकादशी ॥ उद्याची द्वादशी ॥
 पुजुया तुळशी ॥ आज उद्या॥४॥

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar
  # अभंग

37 Views

c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

लावियल्या ज्योती (अभंग)

लावियल्या ज्योती ॥ डोळ्यात भक्तीच्या॥
हरी भजनाच्या ॥ पांडुरंगा॥१॥

आळवितो तुला ॥ भक्तीत रंगतो॥
अभंगातुनि गातो॥ नाम तुझे॥२॥

दया, क्षमा,शांती ॥ तुझ्या ठायी भेटे॥
चित्त शांत वाटे ॥ तुझ्या ठायी॥३॥

नको  राग -द्वेष ॥ नको मनी क्रोध ॥
भजनातुनी बोध ॥ घेऊ दे रे॥४॥  

मन माझे लागे ॥ धावे तुझ्याकडे॥
गावया आवडे॥ गीत तुझे॥५॥

हरी मुखे म्हणा॥ झेंडा हाती धरा॥
पहाट प्रहरा ॥ नाम घ्यावे॥६॥

एक तरी ओवी॥ रोज म्हणा घरी॥
हरीपाठ दारी॥ नित्यदिनी॥७॥

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar
  #अभंग
13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

थोर वैष्णवांचा मेळा 
असे सुखाचा सोहळा 
तुझ्या भेटीचा डोहळा पांडुरंगा ॥ १८ ॥
असे उभा विटेवरी 
दोन्ही हात कटेवरी 
ध्यान तुझे रे संसारी पांडुरंगा ॥ १९ ॥
करुनिया उपासना 
लागोनी तुझ्या चरणा 
हीच खरी आराधना पांडुरंगा ॥ २० ॥
देवा गातो रे अभंग 
सारे देह भान दंग 
लाभू दे सदा सत्संग पांडुरंगा ॥ २१ ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav अभंग
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

पहाट पुष्प ( अभंग)

माता शारदिये॥ नमो नमो माता॥
ठेवितो मी माथा॥ चरणिया॥१॥

जय महालक्ष्मी॥ कोल्हापूरी वसे॥
रुप तुझे दिसे॥ तेजोमय॥२॥

जय माॅ रेणुका॥ गड त्या माहुरी॥
ती डोंगरदरी॥ वेढलेली॥३॥

जय माॅ भवानी ॥ तुळजापुरची॥
तु शिवरायांची॥ आद्यदेवी॥४॥

जय महालक्ष्मी॥ नागपुर क्षेत्री ती॥
तुझी असे ख्याती॥ वरदेई॥५॥

आगारामदेवी॥ जागृत असशी॥
भुमी पुत्री जशी॥ प्रकटली॥६॥

हरऐक स्थळी॥ तिचे वस्तीस्थान॥
देवादिकां मान॥ सदा मिळे॥७॥

मोहन सोमलकर 🌿🌿🌿🌷

©Mohan Somalkar #अभंग
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

#अभंग
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

#अभंग
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

*भा. सा. व सांस्कृतिक मंच नागपूर आयोजित काव्य लेखन उपक्रम*

*काव्य प्रकार _अभंग लेखन*


*विषय _दिनू सोनियाचा*


आळंदी देवाची/ संजीवन धाम /
घेत हरिनाम/ ज्ञानेशाचे//१

वद्य त्रयोदशी /दिनू सोनियाचा/
कार्तिक मासाचा/समाधीचा//२ 

इंद्रायणी काठी/ उत्सव चालला/
भक्तांचा लोटला/ महापूर//३

ज्ञानदेवा दिली /भाषेची मराठी/
सर्व जनासाठी/ ज्ञानेश्वरी//४

साहित्य महंत/ सामर्थ्य भाषेचे /
रुप लालित्येचे / दावियले//५

पसायदान हे/ विश्व कल्याणासी/ 
हेच देवापाशी/ मागितले //६

ज्ञानाची महती / ज्ञानेश्वरी जशी/ 
चौदाव्या त्या वर्षी/ पुर्ण केली//७ 

विठ्ठल दैवत / गुरु हे निवृत्ती/
जागवी प्रवृत्ती/  त्यांचे ठाई //८

विचार ज्ञानाचे/ करु अवगत/ 
प्रकाश सांगत / महतीचे //९ 



डॉ.प्रकाश पांडे
वाशीम

©Mohan Somalkar
  #अभंग
8fa252bb15b99c3bcfbc868b2fa2af36

अमोल पाटील

मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

10 Love

462195f5ab9cb35687069ba222a65a84

HANAMANT YADAV (कवीराज)

विठ्ठलाची बाधा...

वारा देही संचारला । तगमग ही उरीची।
        बाधा झाली बाधा झाली।मज विठ्ठलाची ।।धृ।।

घुमावया लागे मन। विस्कटला पंचप्राण।
        भांभावला आत्मभान। हाक विठ्ठलाची ।।१।।

नामरूपी भस्म ल्यालो। आत्मरूपी शुद्धी प्यालो।
          मोह मायेचा भंडारा‌ । आस विठ्ठलाची ।।२।।

बरळलो सार्थ वाणी । ब्रम्हानंदे पाणी पाणी ।
म्हणे कवीराज ऐसी । धून विठ्ठलाची ।।३।।

कवीराज अभंग

अभंग #Music

6 Love

4898713167eba232c426bd99b8a51e6c

Dhananjay(dhanuj) Sankpal

_#कवी'धनूज.
भावभोळा हरी (अभंग*)
 
भावभोळा हरी । उभा विटेवरी ।
कर कटेवरी । श्री श्रीहरी ।।०१।।

क्षणाक्षणां ध्यान । तुझे रे केशवा ।
तुझाच माधवा । देह माझा ।।०२।।

उभा वारकरी । देह दिधलासी ।
खड़ा ठाकलासी । भक्तजना ।।०३।।

हरी हरी घोष । मनी रात्रंदिनी ।
संत शिरोमणि । तू विठ्ठला ।।०४।।

तुझ सम सारे । रंजले गांजले ।
मज् जवळीले । बां विठ्ठला ।।०५।।

भावभोळे रुप । अनंत ते कोटी ।
नाम घोषओठी । हरी हरी ।।०६।।

वाहिला हां देह । भयमुक्त श्राप ।
तूच मायबाप । अनंताचा ।।०७।।

-लेखक'कवी- (धनंजय संकपाळ)
#धनूज | रंग मनाचे. #अभंग
ad55e39d62f921bb1db9afc1ace11f4f

balaji boinwad

अभंग

बुध्दी हाची प्रपंच! या जडजीवा!!
दोर धरता सहज!अध्यात्माची!!
बघता आयाम! शाश्वत विज्ञानी!!
फेडता ऋण! संवर्धित वसुंधरा!!

© balaji boinwad #अभंग##

अभंग##

8 Love

13e66625b9fead0919601a4c96e95b6a

Devanand Jadhav

थोर वैष्णवांचा मेळा 
असे सुखाचा सोहळा 
तुझ्या भेटीचा डोहळा पांडुरंगा ॥ १८ ॥
असे उभा विटेवरी 
दोन्ही हात कटेवरी 
ध्यान तुझे रे संसारी पांडुरंगा ॥ १९ ॥
करुनिया उपासना 
लागोनी तुझ्या चरणा 
हीच खरी आराधना पांडुरंगा ॥ २० ॥
देवा गातो रे अभंग 
सारे देह भान दंग 
लाभू दे सदा सत्संग पांडुरंगा ॥ २१ ॥ 

✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav अभंग...

0 Love

c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

मन माझे धुंद ॥ आत्मा हा मिलिंद ॥
लागला हा छंद ॥ गीत गाण्या॥१॥

गुरुवर्य माझे॥ कुठे ठाव नाही ॥
फिरे दिशा दाही ॥ मन माझे॥२॥

ह्दयात बसली॥ मूर्ती त्या गुरुंची॥
लाभे ती दयेची ॥ प्रतिभा ती॥३॥

येती समीप ते॥ गुरुवर्य माझे॥
कमी होई ओझे॥ मनाचे या॥४॥

मोहन सोमलकर

©Mohan Somalkar
  #अभंग
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

अभंग ३ ( चादर)

 आपुल्या इच्छेला॥ मर्यादा असावी॥
भरारी मारावी॥ सांभाळून ॥१॥

पाय पसरावे ॥ पाहुन चादर ॥
मोठ्यांचा आदर ॥ सदा असो॥२॥

नको उतमाज ॥ स्थितीचा अंदाज ॥
मनाचा आवाज ॥ ओळखावा॥३॥

मोहमयी जग॥ दुरच रहावे॥
विचार करावे॥ जीवनात ॥४॥

साधुसंत सांगे ॥ जगण्याची रित ॥
छोटेशे गणित ॥ आयुष्याचे ॥५॥

बोले माझा साई ॥ खुप होती शक्ती॥
लोक करे भक्ती॥ ऐकोप्याने॥६॥

पाण्यातुन दिवे॥  साईने लाविले ॥
अमृत पाजिले॥ ज्ञानाचेच॥७॥

मर्यादित इच्छा ॥ साई म्हणे ऐसा॥
मंत्र ऐका तैसा ॥ जगण्याचा ॥८॥

इच्छेची चादर ॥ मर्यादित ठेवा ॥
समजुन घ्यावा ॥ महामंत्र ॥९॥

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar
  # अभंग

327 Views

c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

लावियल्या ज्योती 

लावियल्या ज्योती ॥ डोळ्यात भक्तीच्या॥
हरी भजनाच्या ॥ पांडुरंगा॥१॥

आळवितो तुला ॥ भक्तीत रंगतो॥
गीतातुनि गातो॥ नाम तुझे॥२॥

दया, क्षमा,शांती ॥ तुझ्या ठायी भेटे॥
चित्त शांत वाटे ॥ तुझ्या ठायी॥३॥

नको  राग -द्वेष ॥ नको मनी क्रोध ॥
नामातुनी बोध ॥ घेऊ दे रे॥४॥  

मन माझे लागे ॥ धावे तुझ्याकडे॥
गावया आवडे॥ गीत तुझे॥५॥

हरी मुखे म्हणा॥ झेंडा हाती धरा॥
पहाट प्रहरा ॥ नाम घ्यावे॥६॥

एक तरी ओवी॥ रोज म्हणा घरी॥
हरीपाठ दारी॥ नित्यदिनी॥७॥

मोहन सोमलकर नागपुर

©Mohan Somalkar #अभंग
8d5ea44a2f393bbc485236dc34e437e5

राजेंद्रभोसले

अभंग
हृदयी आकळे। दुर्जना नाकळे।
कोंडले सावळे। परब्रम्ह।।धृ।।

दावूनी कोहळे । पापिया आवळे
टपले कावळे। अधर्मीया।।1।।

विटेवरी रजा। हर्ष हास्य वजा।
महामारी सजा। पामराशी ।।2।।

राजे म्हणे येथे।दुःख जीर्ण तेथे।
गुरुकृपे नाते। अखंडची।।3।।

कवी राजेंद्रकुमार जगन्नाथ भोसले
मो.नं.-9325584845 #अभंग

#nojoto2020
c4ab554d046b0103371ab9f38d3a3753

Mohan Somalkar

अभंग 

जय शिव शंभो॥ उमापती देवा॥
नाम तुझे घ्यावा॥ हर व्यक्ती॥१॥

कृपावंत देव॥ महादेव म्हणा॥
नित्य आराधना ॥ त्याची करु॥२॥

जगजेत्ता भोले॥ डमरुवर डोले॥
प्रसन्नच झाले ॥ मनमाझे॥३॥

वाहे बेल पत्री॥ नमीतात त्याला॥
जो विषाचा प्याला॥ नीलकंठ ॥४॥

मोहन सोमलकर, सुप्रभात

©Mohan Somalkar #अभंग 

#sunflower
2c27623b466be589de3dc5122ae79e13

pandurang kokare

मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...

बोलतो मराठी ऐकतो मराठी...

3 Love

loader
Home
Explore
Events
Notification
Profile