Nojoto: Largest Storytelling Platform

New फजिता पाठवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फजिता पाठवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फजिता पाठवा.

Related Stories

    PopularLatestVideo

SarkaR

पाडवा #Diwali

read more
उपाध्ये परिवार

©SarkaR पाडवा

Mohini

त्या एका बाहुल्याच्या देण्याने 
तिच्या चेहर्यावरची कळी उमलली...
त्या एका बाहुल्याच्या देण्याने 
तिच्या चेहर्यावरची कळी उमलली...
दिवसभर कामाने थकलेल्या तिच्या 
या बाहुल्याने फक्त एका मिठीची अपेक्षा केली..... 
आज टेडी डे म्हणून तो टेडी घेऊन ही आला तिच्यासाठी, 
पण त्या वेडी कडे वेळ ही नव्हता या थकलेल्या बाहुल्यासाठी....
अनपेक्षितपणे बाहेर येऊन तिने मिठीत त्याला घेतले,
अन्  Happy Hug Day In advance हळूच कानात म्हटले...
त्या वेड्या थकल्या बाहुल्याची वेगळीच फजिती झाली,
अन् Hug Day ची तयारी जोरात सुरू झाली....🤗 #फजिती #

रा. वि. कुलकर्णी

गुढी पाडवा...

read more
आसमंती गुढी....आज महामारीने सुनी-सुनी झाली... गुढी पाडवा...

Archana Pol

मनीची फजिती #poem

read more
मनीची फजिती

कपाटातल्या मेव्यावरती
मनीमाउने स्वारी केली
दुपार पाहुन सामसूम ती
दबके पाउल टाकत आली

थकुनी आई जरा झोपली
बाबा पेपरमध्ये गुंग
चिंगी, गोट्या पडवीमध्ये
पत्ते खेळत होते दंग

आजी पोथी वाचत बसली
हळूच तेव्हा मनी सटकली
खिडकीमधुनी घरात शिरली
स्वारी फडताळावर चढली.

फडताळावर चढता चढता
फुलपात्रांची चळत घसरली
वाट्यांचीही धांदल झाली
आई चिडून धावत आली.

गडबड ऐकुन मनी पळाली
काही नाही खैर म्हणाली
इकडुन तिकडे धावत सुटली
चिंगी गोट्या हसू लागली.

मान वाकडी करुन म्हणाली
उगाच का ही उठली आई
कपाटातला मेवा नाही
फटके उगाच बसले बाई.

©Archana Pol मनीची फजिती

राजेंद्रभोसले

शाहिस्त्याची फजिती #Quote

read more
धन्य धन्य भूमाता
ऐकुनी वीर कथा
मराठ्याची शिवगाथा 
छातीचा फुगतो भाता र जीजी।।धृ।।
मराठमुलुखाची शान
हिंदवी स्वराज्याचा प्राण
घेऊन सह्याद्रीची आन
शिवकथेचे ऐका गुणगान।।१।।
शाहीस्त्याजी का बोट छाटली
जाऊनी लालमहाली
मराठी मुलुखाचा अभिमान 
छत्रपतीचं गातो कवाण।।२।। ...क्रमशः शाहिस्त्याची फजिती

Hemant Raseele

घणा फजीता #विचार

read more
mute video

राजेंद्रभोसले

शाहिस्त्याची फजिती

read more
४
 शाहिस्त्यांन वेढा टाकला
लाखो सैन्याने घेरला
शत्रू लागे गड चढाया
गनिमीकावा बांध फोडीला 
दादा दादार जिर्हा जिजी
गरमतेलाचा मारा केला
दगडधोंडे होते जोडीला
गोफणी ने वर्षाव केला
गनीम कसा बिथरला 
दादा दादर........
सैरावरा पळू लागला
सातशेवर गारद झाला
कित्येकनाजखमी केला
थरथर कापू लागला
दादा दादा र.....क्रमशः.... शाहिस्त्याची फजिती

संदीप राक्षे

पाडवा झाला गोड

read more
mute video

HANAMANT YADAV (कवीराज)

गुड़ी पाडवा शुभेच्छा #thought

read more
उजळून जावा आसमंत सारा,
माथी यशाचा दिप  नवा...
संकटे सारी विरुन जावी,
दिघंती उरावा गुडीपाडवा...

कवीराज गुड़ी पाडवा शुभेच्छा

Devanand Jadhav

गुढी पाडवा शुभेच्छा #मराठीकविता

read more
°गुढी पाडवा°

वसंतागमनी, पहाट ती झाली ll 
चैतन्याची लाली, पसरली ll

काठीवरी लोटा, ठेऊनी उपडा ll 
आणिक कपडा, बांधूनिया ll 

कडुनिंब डाळी, फुलहार गाठी
शृंगारली काठी, उर्ध्व दिशी ll 

हळदी नि कुंकू, गंधाक्षदा लेप 
पूजन संकल्प, मनोभावे ll 

बंधू भाव प्रेम, समता नि एकी 
नांदो भुवलोकी, समाधाने ll 

सुख नि समृद्धी, यश आणि कीर्ती 
अशी ही आरती, गातो आज ll 

चैत्र प्रतिपदा, आला हा पाडवा ll
घेऊनी गोडवा, घरोघरी ll

पूर्ण होवो सारी, आपुली ती इच्छा 
प्रार्थतो सदिच्छा, आज दिनी ll 


✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. 
dhamanikarsahityik.art.blog 
 jdevad@gmail.com 
 9892800137

©Devanand Jadhav गुढी पाडवा शुभेच्छा
loader
Home
Explore
Events
Notification
Profile