Nojoto: Largest Storytelling Platform

New मातीचे प्रकार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मातीचे प्रकार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मातीचे प्रकार.

    PopularLatestVideo

Shankar kamble

*भुई भेगाळली खोल* 
 *ओलं मातीची सरली* 
 *डोळं कोरडं आभाळ* 
 *एक उदासी भरली...* 

 *वेड्या-वाकड्या वळणी* 
 *उभी एकाकी बाभळ* 
 *सूर व्याकूळ आळवी* 
 *उन्हं कलता कोकीळ...* 

 *वावटळीचा भिंगोरा* 
 *जीव होई कासावीस* 
 *पानं देठाला पारखं* 
 *जीणं बेवारशी कूस...* 

 *निपचीत पहुडल्या* 
 *सांज धूळीत सावल्या* 
 *मागं सरता सरता* 
 *खुणां काहीशा उरल्या...* 

 *गर्द सोनेरी, पिवळा* 
 *पानगळतीचा सडा* 
 *पायाखाली तुडवीता* 
 *आठवणींचा गुताडा...* 

 *भूल कसली मनाला?* 
 *कल्प कुसुमी दाटला* 
 *आस वळीवाची आता* 
 *देही काहूर पेटला...*

©Shankar kamble #माती #जमीन #वळीवाचापाऊस #मातीचे #मातीत #उन्हाळ्यात 

#sand

पण्डित राहुल पाण्डेय

धर्म प्रचार प्रसार #sitarmusic

read more
mute video

Jayshree Hatagale

#गंध मातीचा

read more
"गंध मातीचा"

पावसाचा पहिला सडा
मातीचा गंध वेडा
उमले मनामध्ये 
जसा केवडा....

पावसाची पहिली सर
मन ओलेचिंब क्षणभर 
अलवार आठवांचा 
पडतो जरा विसर

लवलवती हिरवी पाती
पावसाचे गीत गाती
भिजूनी श्रावणसरींत 
नववधू जणू भासती

सरली ती पानगळ
पानांवर जलबिंदूंचा ओघळ
अन् फुटते नवी पालवी
निसर्गाचं रुप सोज्वळ 

या पावसाच्या धारा
शिवतो मनास गार वारा
मिठीत साजणाच्या 
शहारे हा निसर्ग सारा

हे सौंदर्य सारं
नजरेत भरणारं
क्षण काही सुखाचे
ओंजळीत धरणारं... #गंध मातीचा

Kisan Atole sir

ओढ मातीची #PoeticAntakshri

read more
mute video

vishnu thore

लावू मातीची पणती..... #nojotophoto

read more
 लावू मातीची पणती.....

Devanand Jadhav

मृगाचा पाऊस...गंध मातीचा #Stars #मराठीकविता

read more
मृगाच्या शिडकाव्यात 
गंध मातीचा येई 
पहिल्याच पावसाने
धरणी धुंद होई  

✍🏻© •देवानंद जाधव• 
jdevad@gmail.com 
9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav मृगाचा पाऊस...गंध मातीचा

#Stars

Shankar Kamble

*तुला आकाश ठेंगणं*
*तुझी गवसणी मोठी*
*माती मधल्या मुळाशी*
*नको बेइमानी खोटी...*

*तुझ्या मुखात असू दे*
*सोन्या मोतीयांचा चारा*
*नगं पुढ्यातलं ओढू*
*जाग आता उपकारा...*

*बोल बोलावा मधुर*
*जशी उसाची साखर*
*परनिंदा स्वैराचार*
*माती पातकं खापर...*

*भुकेल्याची भूक जाण*
*तहानेल्या द्यावं पाणी*
*माया ममता असावी*
*ज्यांना जगी नसं कोणी...*

*मूठ,पसा दान द्यावं*
*झोळी पुण्यानं भरावी*
*देह मातीआड गेला*
*तरी किरत उरावी...*

*जल्म माणसाचा मोठा*
*आरं..परत मिळना*
*पुण्य कर्माची शिदोरी*
*पुरं सरनां उरनां...*

©Shankar Kamble #माती #मातीचे #उपकार #पुण्य #पाप #जीवन #जीवनअनुभव #माणूस 

#standout

Narendra

"माडाचे मनोगत" #मराठीकविता

read more
कणा पोखरला तरी,
अजूनही आहे ताठ!
जगण्याची जिद्द मोठी,
जरी मरणाशी गाठ!

माझ्या कण्याकण्यामधे,
किती रहातात पक्षी!
जणू बासरी वाटावी,
अशी काढलेली नक्षी!

त्यांच्या टोचायच्या चोचा,
मला पाडताना भोक!
त्यांची पहायचा कला,
माझा आवरून शोक!

वारा येतो तेव्हा वाटे,
त्यांचे कोसळेल घर!
सरावाचा झाला आहे,
त्यांच्या टोचण्याचा स्वर!

जाता गाठाया आकाश,
नाही जमीन सोडली!
पूल करून देहाचा,
माती-आकाश जोडली!

वय जाणवते आता,
माझा नाही भरवसा!
जगण्याच्या कौलातून,
मरणाचा कवडसा!

घरं सोडा सांगताना,
करकरतो मी मऊ!
पाखरानो शोधा आता,
माझा तरूणसा भाऊ!

सावळांचा भारी भार,
आता मला पेलवेना!
तरी निरोपाचा शब्द,
काही केल्या बोलवेना!

पंख फुटलेले नाही,
नाही डोळे उघडले!
अशा पिल्लासाठी माझे,
प्राण देहात अडले!

जन्म माहेरीचा सरे,
आता चाललो सासरी!
भोकं म्हणू नका देहा,
मी त्या कान्ह्याची बासरी!

कवी - श्री. प्रमोद जोशी - देवगड.

©Narendra "माडाचे मनोगत"

CalmKrishna

सत्य अपने आप नहीं फैलता। #सत्य #प्रचार #प्रसार #असत्य #viral #Truth #Propaganda #विचार

read more
......................

©CalmKrishna सत्य अपने आप नहीं फैलता।

#सत्य #प्रचार #प्रसार #असत्य #viral #Truth #Propaganda

Nagesh pawar

#काठीचे रठ्ठे, #poem #nojotophoto

read more
 #काठीचे रठ्ठे,
loader
Home
Explore
Events
Notification
Profile