Nojoto: Largest Storytelling Platform

New वळ Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वळ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वळ.

Related Stories

    PopularLatestVideo

Shankar Kamble

रानमातीला गहिवर
सोसवंना होरपळ
जीव झाला तोळामोळा
किती जोडावी ठिगळं

आस डोळां पाणावाती
करपली तृण पाती
कसा मोहरे अंकुर?
जीव आला काकुलती

कर ठेवूनी निढळी
तुटं आतडीचा पीळ
मागमूस हरपला
कुठं वळीवाची सर?

तनां- मनांची काहीली
कसा वैशाख तापला
ताप निवाराया कोण?
मेघराजाजी कोपला

हिरमुसली पानं- फुलं
रंग नव्हाळी सुकला
सरीसरीचं गोंदण
देह धरणी आसावला

काळ्यां नभांच्या राशींनी
आसमंत हा उजळू दे
मोत्यां- मोत्यांची रांगोळी
रान- शिवारी सजू दे

©Shankar Kamble #पाऊसधारा #सर #वळीवाचापाऊस #वळीव #विरह #पाऊसाततुझीआठवण 

#Beauty

pravin Wankhede

#Life...... आयुष्यातील वळणे आणि प्रत्येक वळणावर द्यावा कधीतरी मदतीचा हात.....!!

read more
श्वास संपल्यानंतर प्राण जातो एवढाच काय तो अर्थ, पण हाच श्वास एखाद्याच्या श्वासात मिळवुन एखाद्याला जीवन मिळतंय तेव्हा श्वासाचा अर्थ अभिप्रेत होतो.... - प्रविणकुमार वानखेडे #life...... आयुष्यातील वळणे आणि प्रत्येक वळणावर द्यावा कधीतरी मदतीचा हात.....!!

Dileep Bhope

काय गरिबी? काय श्रीमंती?
वळवाचा हा आला पाऊस! गेला पाऊस!

देहामधला श्वासही उसना
पळत्यामागे वेड्या उगा नकोच धावूस..

©Dileep Bhope #वळवाचा_पाऊस

स्वच्छंदी वनिता

अरे ये मित्रा 'वळीव'
तुझा मोर्चा जरा दुसरीकडे पण 'वळीव'
पुण्यातच काय हाण बडिव पळीव
ज्यानं तुला छळलय
त्यालाच जाऊन 'छळीव' 

✍#स्वच्छंदीवनिता #वळवाचा_पाऊस #पाऊस

Bhimrao Tambe

#घरट्याकडे वळा.

read more
घरट्याकडे वळा.

भिमबाच्या लेकरांनो,भिमबाच्या पाखरांनो
घरट्याकडे वळा रे, घरट्याकडे वळा.

घर बा भिमाचं माझ्या ,आता पोखरू नका रे
या छत्र छायेखाली घ्या श्वास मोकळा.

बेकीचं राजकारण सोसलं पिढ्यापिढ्यांनी
संघटित होण्या आता तू भेट घे गळा.

खांद्यावरी मिरवले कोनाकोणाचे झेंडे
तडफडतो फडफडतो निशाण हा निळा.

दिला बा भिमानं माझ्या तथागताचा धम्म
बुद्धाच्या धम्माचा रे तुला लागू दे लळा.

भिमबाच्या लेकरांनो,भिमबाच्या पाखरांनो
घरट्याकडे वळा रे, घरट्याकडे वळा.

                             ------भिमराव तांबे.
                                  #घरट्याकडे वळा.

Vrishali G

वळण

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile