Nojoto: Largest Storytelling Platform

New रोहू फिश फूड Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about रोहू फिश फूड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रोहू फिश फूड.

Related Stories

    PopularLatestVideo

Rohan Rajasthani

रोहन

read more
जानता हूँ कि आसान नहीं है तुम को भुल पाना
पर मुश्किल भी तो नहीं है इस दुनिया से चले जाना


रोहन राजस्थानी रोहन

Sangeeta Verma

तेरे साये से मिल कर 
लगा जैसे 
जिन्दगी आ मिली हो 
धडकन जब धडकती है 
लगा जैसे 
तेरी रूहू आ मिली है ।
( चाँदनी)

©Sangeeta Verma #रूहू #

Rohini Pande

#रोही#

read more
कवी ही जात माझी
कविता हा धर्म आहे,
शब्दांचे अमृत हेच
जगण्याचे मर्म आहे..१

नसानसात वाहतो
भावनांचा गहिवर,
शब्दातून उमटतो कधी
अव्यक्तसा कहर..२

जाती धर्म पाहून का
भावना कल्लोळतात,
असा कोणता झेंडा आहे
ज्यांना भावना कळतात..३

सारेच रंग तर कवितेत मग
काव्यधर्मच पाळावा,
सुंदर सुगंधी शब्द योजून
शब्दसुमनी गजरा माळावा..४

प्रत्येक मनामनात मग
फक्त स्नेह अंकुरेल,
तरल अश्या अनुभूतींनी
सारंच जग हसेल-बहरेल..५

     रोहिणी पांडे
      ९/१०/१९ #रोही#

Rohini Pande

#रोही#

read more
मुक्तक

तुला विसरणे ..शक्य नाही
तुजविन जगणे...शक्य नाही

तुझ्यात रमले मी अशी की
तुझा दुरावा..शक्य नाही..

  रोहिणी पांडे #रोही#

Rohini Pande

#रोही

read more
गंधात कामिनीच्या, भरला वसंत आहे
वेडावते दुरूनी,भलतीच खंत आहे

सांभाळ बालिके तू, आता जरा स्वतः ला
शृंगार मांडण्याला..थोडी उसंत आहे

गर्वात सुंदरी ती,जाई निघून कोठे..?
मोहात पाडण्याची , इच्छा अनंत आहे

  गालावरी सखीच्या, गर्वात तीळ शोभे
   राहे समीप इतका, तो भाग्यवंत आहे

   निष्ठूर रूपगर्वी, ती चंचला दिवानी
  हृदयात खोल इतकी, का शोभिवंत आहे

टेकून नित्य माथा, भक्तीत रंगले मी
कळले मला न तेव्हा, खोटा  महंत आहे

  नासून जात आहे..हापूस कोकणाचा
   राजा जरी फळांचा... तो नाशवंत आहे

©Rohini Pande #रोही

Rohini Pande

#रोही

read more
तेज मनाचे मज लाभू दे काळोखाच्या आधी
मनातल्या मज अंधाराने छळावयाच्या आधी

गालावरची खळी खुलावी तू हसताना  राणी
अधरावरची गोडी चाखू उजडायाच्या आधी

कुणीतरी मज आवडले... हे कधीच नव्हते  झाले
बरा दुरावा काही भलते घडावयाच्या आधी

उंच उडावे नभी फिरावे असे ठरविले होते
पंख  छाटले कोणी माझे उडावयाच्या आधी

मैत्री केली माझ्यासोबत थोड्या  स्वार्थासाठी 
विश्वासाच्या  तुटल्या तारा जुळावयाच्या आधी

हसणे  रडणे  दोन्ही नाणे आयुष्याचे येथे
हसून घ्यावे पुष्कळ मनभर रडावयाच्या आधी


पाया मध्ये पाय घातले कित्येकांनी माझ्या
तरी पांगळी झाले नाही चालायाच्या आधी

दान मिळाले आयुष्याचे आनंदाने जगण्या
 जगून घेऊ चल, मृत्युला भेटायाच्या आधीc

©Rohini Pande #रोही
loader
Home
Explore
Events
Notification
Profile