Nojoto: Largest Storytelling Platform

New माहेरी पाठवली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about माहेरी पाठवली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माहेरी पाठवली.

Related Stories

    PopularLatestVideo

HARSH369

mute video

vishnu thore

माहेर....

read more
 माहेर....

ज्ञानेश्वर मुसळे

माहेर

read more
तुझी कविता तर आता माझं 
माहेर झालंय,
अनं
 माहेराचा बालपण 
तुझ्या कवितेतल्या 
भावनांमधी आलयं.

 माहेर

राज श्री

माहेर

read more
कशी सांगू तूला गं आई
जीवाची माझ्या घालमेल 
माहेरच्या आठवणीने
जीव कासावीस होई
किती दिवस झाले आई
तुला पाहिले नाही 
बाबांसोबत मनसोक्त 
भरभरून बोलले नाही 
सासर माझं असल
सोन्याचा पिंजरा जरी
माहेरच्या आभळमायेत
घ्यावीशी वाटते गंआई
मला उंच भरारी
मनातल्या सारे विचार 
इथेच ठेवून जावेत सासरी 
दोन दिवसापुरतं विसरून बाईपण
व्हावी तुमची लाडकी सोनपरी
खूप वाटतंय गं मला आई
यावं चार दिवस माहेरी 
माहेरच्या आठवणीने
डोळ्यांत दाटतयं पाणी माहेर

Vrishali G

माहेरची साडी..

read more
mute video

Pratik Patil Patu

माहेरची सुट्टी

read more
माहेरची सुट्टी

माहेर माझ्या आवडीचं
बाबांच्या छायेच , आणि
आईच्या मायेच
हे माहेर माझ्या आवडीच

माहेरात मी आराम करते
आई सगळं काम करते
चांगलं चांगलं करून घालते
आणि मी फक्त,बसून खाते

मग बाबा मला कपडे आणतात
ते मी घालते,
आणि छान दिसते

भाऊ माझे ट्रिप काढतात
स्वतहाच सगळं प्लॅनिंग करतात
मग आम्ही जातो, ट्रीपला
कुठेतरी, फिरायला

ट्रीप मध्ये खूप मज्जा येते
बघता बघता वेळ सरते
आई मला निरोप देते
मग मी सासरी जाते

अशी ही सहल, दिवाळीत घडते
सांगताना मात्र, गंमत वाटते माहेरची सुट्टी

Life is Happy

एका सासरी नांदत असलेल्या मुलीची माहेरतील असलेली आई साठी ही ओढ़ 💗👩‍👧 आई चार दिवस माहेरी याव म्हणतेय... #Allegations

read more
mute video

Swati Mahendra Jadhav

माहेर म्हणजे जिव्हाळ्याचा विषय..#माहेर. #कविता #stay_home_stay_safe #poem

read more
माहेरचे अंगण..

माझ्या माहेरची वाट चालता चालता..
 मनी दाटला आठवणींचा उजाळा..
लहानपणीचा खेळ अंगणी मांडला तो डाव..
मनी दाटला मायेचा तो भाव..
माझ्या माहेराच्या अंगणी या ग! सख्यानो..  
खेळ लपाछपी आणि पाठशिवणीचा मांडू या..
 किती किती लहानपणीच्या आठवणी आठवू ग सये आता..
मनी दाटला अश्रूंनी गळा माहेराचं गुण गाता गाता.. 
माझ्या घराचे अंगण आणि शाळेचे ते पटांगण..
मनी दाटला अभिमान... ऊर भरला भरला..
माझ्या अंगणी पोहचता माय उभी ती दारी..
हाती तुकडा नी पाणी आनंदाने डोळे तिचे भरी..
घरी पाऊल टाकता टाकता तिची जेवणाची घाई..
सांग तुला काय वाडू भाजीभाकरी की दुधावरची सायी..
घर माझेच ते पण आता काही वेगळेच भासे..
सारे माझेच असे पण परतीची वाट मात्र दिसे..
गोड कौतुक आणि लाड करून घेता..
विसरून गेले मी चार दिवसाचा तो पाहूणचार होता..
रात्र सरता सरता उद्या दिवस निरोपाचा..
अंगणात उभा राहून बांध फुटला आठवणींचा..
काही राहिले तर नाही ना सारे न्याहाळून झाले..
माझ्या मायेच्या माणसांना डोळ्यात साठवून झाले..
जड अंतकरणाने बाहेर पाऊल निघाले..
आईचा निरोप काळजी घे सांगून झाले.. 
सारे अंगण पाहता पाणी पापण्यांच्या आत दडे..
पुन्हा येण्याच्या आशेने आठवणी मागे पडे..
माझ्या माहेरचा निरोप घेता घेता..
मनी दाटला पुन्हा आठवणींचा उजाळा..

©Swati Mahendra Jadhav माहेर म्हणजे जिव्हाळ्याचा विषय..#माहेर. #कविता

#stay_home_stay_safe

HANAMANT YADAV (कवीराज)

माहेरची सय.... (ओवी) #Quote

read more
माहेरची सय... (ओवी)

माझ्या माहेराची वाट। सोनचाफ्याचा गं घाट।
तिथ घाटामंधी माट। घेई जाता मी घोट ।।धृ।।

घोट घेते अमृताचा। त्यात गोडवा मायेचा।
गावच्या महादेवाचा। दिस तिथुन माचा ।।१।।

लागूण महादेवाला। वाडा बांन गं बांधीला।
भिंगरुळ्या कौलातला।गडकोट शोभीला ।।२।।

तिथं गोठ्यातली गाय। हंबरी पाहता माय।
येता माहेरची सय। कंठ दाटतो बाय ।।३।।

दाटलेल्या कंठामंधी। हुंदका काळजामंधी।
माहेरच्या मातीमंधी। माझ मन गं बंदी।।४।।

बंदी मनाची चाहूल।चाफ्याला गं आली फूल।
बाप न्हायला येईल। गं अडलं पाउल ।।५।।

कवीराज।
८६९८८४५२५३ माहेरची सय.... (ओवी)

Sai Raj Mainkar

#AakhriAlvida माहेर ❤️ #कविता

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile