Nojoto: Largest Storytelling Platform

New वाटणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाटणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाटणी.

Related Stories

    PopularLatestVideo

Anil Sapkal

वाटणी #DesertWalk

read more
बापाच्या उत्तरकार्याला
भावाभावात वाद झाला
मोठ्यानं काठी घेतली 
बारक्यांन कुऱ्हाड घेतली
हाणामारी सुरू झाली
कुणाचं डोकं फुटलं 
कुणाचं नडगं फुटलं
बायकांनी केस ओढली 
एकमेकींची साडी फाडली
म्हातारी उंबऱ्यात बसून 
सार काही बघत होती
ढसाढसा रडत होती
म्हातारी रडतच म्हणाली
शेताच्या तुकड्यापाई
आपापसात भांडू नका
भावाभावाच रक्त आसं
वैऱ्यासारखं सांडू नका
एकदाचं काय ते वाटून
घ्यायचं ठरलं
म्हातारीच घर पंचांनी भरलं
फुटाला फूट कुरीला कुरी 
सोन,नान,भांडीकुंडी 
सगळ्याच्या याद्या केल्या
घराच्या, शेताच्या उभ्या आडव्या 
वाटण्या झाल्या 
म्हातारी बाजूला बसून
डोळ्यातील टीप पुसत होती
घरादाराची बरबादी तिला
डोळ्यासमोर दिसत होती
म्हातारीला कुणी बघायचं
का तिनं अश्रितासारख जगायचं
शेवटी नंबर तिचाच आला
थोरला पुढं येऊन बोलला
आतापर्यंत मीच साऱ्या 
घराचा भार पेलला
म्हातारीच कायते तुम्हीच बघा 
माझ्या मागं कसली 
टीमटीम लावू नगा
धाकल्यान भी हात झटकलं
म्हातारीच मुटकुळ 
मधल्या मधीच लटकलं
माझी र कशाला अडचन
माझ्या जीवनाचं पांग फिटलं
तुम्ही सुखी राहा बाबांनो
म्हणत म्हातारीने उंब्र्यातच 
डोळं मिटलं वाटणी

#DesertWalk

Swapnali Gurabe Dhonukshe

माझ्या वाटणीचा पाऊस... #poem

read more
mute video

sandy

वाटणी - एक उत्तम निर्णय 🏠🏘️🚗🏍️💵💴👌🏻👌🏻 वडील - बापुराव मोठा मुलगा - राकेश मधवा - सुरेश धाकटा - मुकेश #story #nojotophoto

read more
 वाटणी - एक उत्तम निर्णय  
🏠🏘️🚗🏍️💵💴👌🏻👌🏻

वडील -          बापुराव 
मोठा मुलगा -   राकेश
मधवा -    सुरेश
धाकटा -      मुकेश

Shailesh Hindlekar

पाऊस कविता - आजची कविता पावसाला काय झालंय? कुठे पूर येईपर्यंत सांडतोय. कुठे वाट पाहणाऱ्याच्या डोळ्यात असावं आणतोय.. देवा..हा सावता सुभा सो #poem #nojotophoto

read more
 पाऊस कविता - आजची कविता
पावसाला काय झालंय?
कुठे  पूर येईपर्यंत सांडतोय. कुठे वाट पाहणाऱ्याच्या  डोळ्यात असावं आणतोय..
देवा..हा सावता सुभा सो

Sarita Prashant Gokhale

वारकामिनी वृत्त लगावली:- गालगाल गालगाल गालगा गोफणीत दुःख एक साचते राखणीत दुःख एक साचते वासरास घालताच वेसणी #Thinking #मराठीशायरी

read more
वृत्त --वारकामिनी 

गोफणीत दुःख एक साचते
राखणीत दुःख एक साचते

वासरास घालताच वेसणी
दावणीत दुःख एक साचते

काळजात एक शब्द जोडला
लेखणीत दु:ख एक साचते

वाटणीत मोजतात अंतरे
मांडणीत दु:ख एक साचते

सावलीस थांबलीत पाखरे
पेरणीत दुःख एक साचते

©Smita Raju Dhonsale वारकामिनी वृत्त 
लगावली:-
गालगाल गालगाल गालगा

गोफणीत दुःख एक साचते
राखणीत दुःख एक साचते

वासरास घालताच वेसणी

Sarita Prashant Gokhale

वारकामिनी वृत्त लगावली:- गालगाल गालगाल गालगा गोफणीत दुःख एक साचते राखणीत दुःख एक साचते वासरास घालताच वेसणी #zindagikerang #मराठीशायरी

read more
वारकामिनी वृत्त 
लगावली:-
गालगाल गालगाल गालगा

गोफणीत दुःख एक साचते
राखणीत दुःख एक साचते

वासरास घालताच वेसणी
दावणीत दुःख एक साचते

काळजात एक शब्द जोडला
लेखणीत दु:ख एक साचते

वाटणीत मोजतात अंतरे
मांडणीत दु:ख एक साचते

सावलीस थांबलीत पाखरे
पेरणीत दुःख एक साचते

©Smita Raju Dhonsale वारकामिनी वृत्त 
लगावली:-
गालगाल गालगाल गालगा

गोफणीत दुःख एक साचते
राखणीत दुःख एक साचते

वासरास घालताच वेसणी

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण या विषयावर लिहीणार आहोत. भारत मातेची व्यथा... #भारतमातेचीव्यथा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best #YourQuoteAndMine #bestofyqmarathiquotes

read more
भारतमातेची व्यथा भारतमाताच जाणते,
तिच्या स्वातंत्रतेसाठी ज्यांनी बलिदान दिले,
त्यांचीच पिढी आज तिला तुकड्यांमध्ये वाटणी करू पाहते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण या विषयावर लिहीणार आहोत.
भारत मातेची व्यथा...
#भारतमातेचीव्यथा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best

yogesh atmaram ambawale

#पगार #yqtaai #yourquotemarathi #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार येतो पगार जातो पगार, शिल्लक कुठे राहतो पगार. ठरलेली असते त्याची येण्याची

read more
येतो पगार जातो पगार,
शिल्लक कुठे राहतो पगार.
ठरलेली असते त्याची येण्याची तारीख,
तरी वाटते लवकर का होत नाही पगार.
हात नाही त्याला,ना ही त्याला कुठले पाय,
तरीही अनंत वाटा त्याला,कुठेही निघून जाई.
महिनाभर वाट पाहावी लागते त्याची,
तेव्हा कुठे त्याचे आगमन होते.
आनंद खूप होतो त्याच्या येण्याने,
पण त्याची सोबत जास्त वेळ कुठे राहते.
आई देखील वाट पाहत असते त्याची,
बायकोचे ही प्लॅन पहिलेच ठरलेले असते.
मुलांचे तर काही विचारूच नका,
स्कूल फी,क्लास फी साठी नुसतीच रड चालू असते.
आठवडा तेवढा काय तो व्यवस्थित राहतो,
नंतर मात्र सारे गणित बिघडते.
महिना पूर्ण भरायच्या अगोदरच,
पगाराची वाटणी मात्र ठरलेली असते.
असा हा पगार केव्हा येतो केव्हा जातो,
काहीही कळत नसते,
पण याच्या दर्शनासाठी मात्र,
महिनाभर राबावे लागत असते. #पगार 
#yqtaai #yourquotemarathi #yqmarathi #मराठीलेखणी #माझेविचार 
येतो पगार जातो पगार,
शिल्लक कुठे राहतो पगार.
ठरलेली असते त्याची येण्याची

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण या विषयावर लिहीणार आहोत. भारत मातेची व्यथा... #भारतमातेचीव्यथा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best #YourQuoteAndMine #marathiquotes

read more
ह्या भारतमातेला काय वाटेल ह्याचा कुणीच विचार करत नाही,ह्या उलट जातपात धर्मावरून राजकारण करून भारतमातेला कसं लुटता येईल ह्याचाच विचार करीत आहेत.
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेली भारतमाता आज स्वत्याच्या धारतीपुत्रांची गुलाम झाली आहे.
कित्येक असे देखील आहेत ह्या देशात ज्यांची कुठलीही पात्रता नसताना भारतमातेची खोटी शपथ घेऊन तिचा मान राखण्याची गोष्ट करीत आहेत.
असे ही काही राजकारणी आहेत ज्यांना प्रजासत्ताक म्हणजे काय विचारले तर उत्तर देता येत नाही,वंदे मातरम् म्हणावे म्हटले तर ते ही येत नाही.
भारतमातेची व्यथा जाणायची असेल तर खरंच आपल्या आईचा दर्जा द्या आणि मग बघा तिच्या मनात काय चाललंय ते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण या विषयावर लिहीणार आहोत.
भारत मातेची व्यथा...
#भारतमातेचीव्यथा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण या विषयावर लिहीणार आहोत. भारत मातेची व्यथा... #भारतमातेचीव्यथा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best #YourQuoteAndMine

read more
काय नि कशी मांडावी भारतमातेची व्यथा,
गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावे म्हणून किती स्वातंत्र्यवीरांनी आपले जीव गमावले,
कित्येक मातांनी आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळावे म्हणून स्वतःच्या मुलांना देशासाठी कुर्बान केले,
अशा ह्या स्वातंत्र्य वीरांच्या कुर्बानीतून,बलीदानातून आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळाले,आपली भारतमाता गुलामगिरीतून मुक्त झाली.
पण आज कुणाला ह्या भारतमातेच्या व्यथा दिसत नाही,ज्यांनी ज्यांनी भारतमातेच्या स्वातंत्रतेसाठी आपले प्राण पणाला लावले,ह्या भारतमातेसाठी कुर्बान झाले,त्यांचीच पिढी आज ह्या भारतमातेची वाटणी करू पाहत आहे.
भारतमातेच्या स्वातंत्रतेसाठी पूर्वी कुणीच जातपात धर्मपंथ पाहत नव्हते,हिंदू,मुस्लिम,शीख ,ईसाई सर्व एकत्र येऊन लढत होते.
पण आज ह्या भारतमातेला खूप व्यथा होत आहे कारण तिचे मुले आज वेगवेगळे होऊन स्वतःचे राज्य निर्माण करू पाहत आहेत,भाईचारा विसरून स्वार्थासाठी दंगली करू पाहत आहेत,
तू हिंदू,तू मुस्लिम,तू शीख,तू ईसाई अशा अनेक अनेक जाती धर्मा वरून वाद घालीत आहेत. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण या विषयावर लिहीणार आहोत.
भारत मातेची व्यथा...
#भारतमातेचीव्यथा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best
loader
Home
Explore
Events
Notification
Profile