Nojoto: Largest Storytelling Platform

New बळीराजाची लेकरं Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about बळीराजाची लेकरं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बळीराजाची लेकरं.

    PopularLatestVideo

AMOL BHALERAO

व्यथा बळीराजाची..😥 #navratri2020

read more
बारा लाख रूपयाची कोथिंबीर मात्र  
तुमच्या सर्वांच्या डोळ्याला दिसली
पण उद्धवस्त झालेल्या बळीराजाच्या  
संसाराची आज तुम्हाला चिंता कसली

साहेब चिखलं लागतो तुमच्या पायाला 
बांधावर येऊन आमची अवस्था पाहायला
बर वाटत तुम्हाला राजकारण करताना  
गाडीमध्ये बसुन इकडून तिकडे फिरायला

मिडियावाल्यांना तर पाण्यात बुडलेल्या 
पिकामध्ये कधी काही दिसणारच नाही 
कारण सुशांतसिंग आणि कंगनाशिवाय 
त्यांना तर दुसर काही सुचनारच नाही

सारं पीक वाहत जाताना पाहुन
आज कंबरड आमचं मोडलयं
कर्तुत्वाच्या बळावर पाहीलेलं
स्वप्न मात्र अर्ध्यावरच गाभडलयं

मृत्यूच्या विचारात असलेल्या बळीराजाला
सरकार आता तरी मदतीचा हात द्या
आश्वासने तुमची ठेवुन जरा बाजुला फक्त  
या संकटातुन सावरण्याइतकचं बळ द्या...

                 ✍- अमोल ईश्वर भालेराव व्यथा बळीराजाची..😥 

#navratri2020

Anna Shinde Patil

...!!! आम्ही शेतकर्यांची लेकरं...!!! #poem

read more
!!! आम्ही शेतकर्यांची लेकरं !!!

    " आम्ही शेतकर्यांची लेकरं...
    " खातो मिरची भाकर...

   " कसला तो, पिझ्झा बर्गर...
   " पुरवितो सार्या जगा साखर...

   " आम्ही शेतकर्यांची लेकरं...
   " जगवितो रान हिंडे पाखरं...

   " रोजच राना वनात राबणं...
   " धाग धुगीत, कष्टाचं जगणं...

   " सार्या जगाला देतो, धान्याचं दानं...
   " आम्हावरच येते, उपाशमारीची वानं...

   " आम्ही शेतकर्यांची लेकरं...
  " आम्हावर दुःख वेदनेचा  मारं...

  " जीवलग दोस्त आमचे गाईंचे वासरं...
  " वनात नाचतात, पिसारा फुलवून मोरं...

  " आम्ही शेतकर्यांची लेकरं...
  " आमच्या नशिबी सहनशीलतेचा पाजरं...

  " आम्ही शेतकर्यांची लेकरं...
  " खातो मिरची भाकरं...


        - भागवत शिंदे पाटील.
             उक्कडगांवकर....
         हॅलो - ९८३४०५५२९५... ...!!! आम्ही शेतकर्यांची लेकरं...!!!

mahi Huse

लेकरं इवलीशी... उडणारी #HopeMessage #Poetry

read more
लेकरं इवलीशी…

परत आलीच नाहीत
ती लेकरं इवलीशी,
चोचीत घेऊन भूक
गगन सारे भिरभिरणारी
सैरभैर या आकाशी…

उपकरणांची भरती उभी 
सैतानांची फौज भली ही
मौज मस्ती मनुष्य देही
मुकली बिचारी ही जिवांशी..

घट काळीज ते पाझरले
मनीं असे हे भय दाटले
झेप तुझी ही नवलाईची
बुध्दी देहिंनी का पंख छाटले

कधी न पडला कानी टाहो
स्वप्न बिलगली घरट्याशी
आर्त आता येती ऐकु दुरून
वैर काय आमचे माणसांशी?
                 - M.j. Huse

©mahi Huse लेकरं इवलीशी... उडणारी

#HopeMessage

prakash dattatray katkar

शेतकऱ्याची लेकरं 🌾 #shetkari #shetkaribaap #farmar #Kisan #VAIRAL #notojo #RealHero #मराठीसंस्कृति

read more
mute video

Ashok kale

मैं सही फैसले लेने में विश्वास नहीं रखता, बल्की मैं फैसले लेकरं उन्हे सही साबीत करता हूं..@k #शायरी

read more
मैं सही फैसले लेने में
विश्वास नहीं रखता,
बल्की मैं फैसले लेकरं
उन्हे सही साबीत करता हूं..@k मैं सही फैसले लेने में
विश्वास नहीं रखता,
बल्की मैं फैसले लेकरं
उन्हे सही साबीत करता हूं..@k

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे का जगावे... #काजगावे चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine

read more
धाडले गेले होते जेव्हा वृद्धाश्रमात,
चेहऱ्यावर दिसत नव्हते तरी खुप दुःख होते मनात.
का जगावे,कुणासाठी जगावे हा प्रश्न होता तेव्हा मनी,
जाता वृद्धाश्रमात,जाणवले,आपल्यासारखे इतर ही आहेत कुणी.
सोसले होते कित्येक दुःख,कित्येक अडचणींना सामोरे गेले होते,
धाडले ज्या लेकरांनी आज वृद्धाश्रमात,त्यांच्यासाठी रक्ताचे पाणी केले होते.
सोय सुविधा नव्हती कुठली,पैश्याची ही नेहमी चणचण होती,
पण पोरांना खाली पणा वाटू नये म्हणून कधी दाखवू दिली नव्हती.
खुप हाल अपेष्टा सहन करीत मुलांना चांगले शिक्षण दिले गेले,
मोठे होता लेकरं,अपमान करू लागले,जाणवले जसे शिक्षण सारे वाया गेले.
वाटले होते,जगणे थोडे सुखकर राहील, मुले जेव्हा मोठे होतील,
स्वप्नात हि विचार नव्हता कधी,की म्हातारपणी एका बाजूला सोडून देतील.
लग्न केले मुलांचे,आनंद खुप मनी,जेव्हा नातवंडे ही झाली,
काही दिवसातच,नातवंडे वाढत असता,मुलांना आमची अडचण भासू लागली.
किती आणि कसे सहन करावे,जन्म दिला ज्यांना त्यांनी असे का वागावे,
चिंता वाढते,विचार येतात मनात,कुणासाठी आणि का जगावे.— % & शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
का जगावे...
#काजगावे

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai

sandy

जखमा उरातल्या.... बारका भाऊ जाऊन सहा महिने झाले होते... इकडे रोज दुःख मनात ठेवुन अनयाचं जगणं चालु होत.... राखी आली, आठवण झाली.... भाऊबिज #story #nojotophoto

read more
 जखमा उरातल्या....

 बारका भाऊ जाऊन सहा महिने झाले होते... 
इकडे रोज दुःख मनात ठेवुन अनयाचं जगणं चालु होत.... राखी आली, आठवण झाली.... भाऊबिज

sandy

*कारभारीण* भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक #story #nojotophoto

read more
 *कारभारीण*
 भल्या पहाटेच उठली ती. शेजारी तो शांत झोपलेला. चेहऱ्यावर तेच खुळावणारं हसू. जगाच्या काळज्या वाहूनही हा इतकं निरागस कसं काय हसू शक

sandy

कचऱ्या चौकातल्या सिग्नल च्या खाली जी मोकळी जागा होती ना तिथं राहायचा. त्याच्या बाजूला च पाईप लाईनवर मल्ली राहायची. मल्ली गजरे बनवायची अन कचऱ #story #nojotophoto

read more
 कचऱ्या चौकातल्या सिग्नल च्या खाली जी मोकळी जागा होती ना तिथं राहायचा. त्याच्या बाजूला च पाईप लाईनवर मल्ली राहायची. मल्ली गजरे बनवायची अन कचऱ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile