Find the Latest Status about रोही पंचाक्षरी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रोही पंचाक्षरी.
Rohini Pande
रोही पंचाक्षरी नभ हर्षला तुज दिधला रंग आकाशी वस्त्रे भरला.. नेत्र झुकले लज्ज जाहले मौन अधरी तरी बोलले मॉडर्न जरी लाजली खरी झुकले नेत्र अबोल जरी कानात डुल मनास भूल गोड गोजिरी तुझी चाहूल रोहिणी पांडे #रोही पंचाक्षरी#
Rohini Pande
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा रोही पंचाक्षरी °°°°°°°°°°°°°° दीप पेटले मनी हसले उत्सवात या तेज सांडले.. रोहिणी पांडे #रोही पंचाक्षरी#
Rohini Pande
ऊन कोवळे रंग सोहळे केशर प्राची रूपआगळे रोहिणी पांडे #रोही पंचाक्षरी,#
Rohini Pande
किती उन्हाळे नि पावसाळे संगे तुझिया प्रीत झळाळे रोहिणी पांडे रोही पंचाक्षरी
Rohini Pande
कळी फुलली ती बहरली गिरकी घेत गाली हसली..१ दवात न्हाली थेंब ते भाली सलज्जतेची वदनी लाली..२ खट्याळ वारा अंदाज न्यारा कळीस स्पर्शे अंगी शहारा..३ गुज मनात सांगे कानात खट्याळ वारा मोहे स्पर्शात..४ धुंद सुगंधी ही अनुबंधी प्रीत बावरी अशी स्वच्छंदी..५ रोहिणी पांडे रोही पंचाक्षरी
Rohini Pande
#Pehlealfaaz रोही पंचाक्षरी °°°°°°°°°°°°°°° पहाट वारा अंगी शहारा राधा तंद्रीत वेणु पुकारा रोहिणी🌹 #रोही पंचाक्षरी#
Rohini Pande
का रे दुरावा? °°°°°°°°°°°°°°°° दुरावा छळे तुज न कळे हे विरहाचे नाते आगळे.. कसे सांगावे मन गुंतावे तुझ्या स्मरणे प्रीतीत न्हावे..२ तुझी शांतता जरा व्यस्तता मन अस्वस्थ असे गुंतता..३ प्रेम भावना मनी यातना कोण करेल अरे सांत्वना..४ सोड ना राग रे अनुराग प्रीत धुंदीत मनाची बाग..५ रोहिणी पांडे #रोही पंचाक्षरी#
Rohini Pande
भयहारिणी भवतारिणी जगजननी भव भामिनी..१ कुल स्वामिनी दुर्ग वासिनी हे प्रभावती सिद्ध योगिनी..२ ध्येय रूपिणी मधु भाषिनी हे दयानिधी शत्रू नाशिनी..३ सर्व मंगला त्वं हि श्यामला हे ब्राह्मसुता वंद्य सकला..४ रोहिणी पांडे #रोही पंचाक्षरी-देवी महती#
Rohini Pande
रोही पंचाक्षरी °°°°°°°°°°°°°° श्रम सामर्थ्य सांगते सार्थ बैलांची जोडी श्रमांची शर्थ..! थिजती गात्र