Find the Latest Status about पाऊली चालती पंढरीची वारी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाऊली चालती पंढरीची वारी.
पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी
ओढ तूला भेटण्याची आहे मनात खोलवर, काय देऊ तूला विठू मी माझा फाटका पदर.. दिलंस मला तू सोन्यासारख ते रान, रानात पिकते धन अन फुलते माझ्या कारभाऱ्याच मन... तू पुरवशी आमच्या दोन लेकरासी घास, मनात असते नेहमी तूला भेटण्याची आस.. दिस मोजत मोजत येईल सुखाची ती लाट, तूझ्या भेटीसाठी माझं अख्ख कुटूंब चालत वारीची वाट.. ©पूनम शशिकला देवीदासराव कुलकर्णी #prayer #पंढरीचीवारी #मराठी #marathikavita #marathi #martahipoem मित्रांनो दरवर्षी लाखो वारकरी चालत पंढरीला जातात..महाराष्ट्राची संस्कृ
vishnu thore
वारी पंढरीची ... जनार्दन देवरे,मनमाड. अक्षरचित्र - विष्णू थोरे ९३२५१९७७८१
Shankar kamble
आसावला जीव।ओसंडला भाव। अंतरीचा ठाव।सावळ्या तू।।१।। कातर मनाला।आठवं क्षणाला। काकडा ओवला।देहरूपी।।२।। मनं ओढावते।दर्शनांते आस। जीवां रात्रंदिस।ध्यास तूझा।।३।। तोडीयले बंध।पाश मायारुपी। अंतरी स्वरूपी।तूच सदा।।४।। काय करू सांग।चित्त उसवले। पाहतो वाटुले।पंढरीची।।५।। अंतरी उमाळा।तोची घननीळा। सांगू लडिवाळा।गूज मनीं।।६।। नाद प्रसवला।परब्रह्म देहीं। मनाचियां डोही।नाद रंगे।।७।। देहादेही एक।भाव समरूप। पापांचे कळप।सुटती बां।।८।। मागणें न दुजें।आतां उरे काही। मनीं वसे ठायी।पांडुरंगे।।९।। श्री. शंकर नागनाथ कांबळे ©Shankar kamble #वारी #विठ्ठल #पंढरपूर #माऊली #वारी_जांऊ #पांडुरंग #विठ्ठल_रखुमाई #सावळा
Rajendrakumar Shelke
*पंढरीचा राजा* *षडाक्षरी काव्य* 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 वैकुंठाचा वासी पंढरीचा *राजा,* राम कृष्ण हरी अभंगाची *मजा.* विठू माऊलीचा गजर *हरीचा,* विठुच्या भक्तीत संसार *सुखाचा.* स्नान करोनिया चंद्रभागा *तीरी,* भक्तिभाव वाहे कर *कटेवरी.* पंढरीत होई वारकरी *दंग,* सृजनांचा मेळा पाहतो *श्रीरंग.* ---------------- *✍️राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke पंढरीचा राजा