Nojoto: Largest Storytelling Platform

New उतू चालली Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about उतू चालली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उतू चालली.

Related Stories

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

वारी © अल्पेश सोलकर. वारी.. वारी चालली पंढरीशी डोई तुलसी सोबती माय चालली....

read more
mute video

Anil Bhoir

चाललय काय...

read more
mute video

डॉ केशव घोडके

चालती फिरती बाहुली #Pehlealfaaz

read more
#Pehlealfaaz इवल्याशा बाहुलीला
शोभून दिसतो साज.।
प्रत्येकाच्या मनावरती
करत राहील राज..।

गोरे गोरे गाल तिचे
ओठावरती लाली..।
जशा नाजूक पाकळ्या
गुलाबाची कळी..।

पाणीदार डोळे तिचे
चश्मा शोभतो सुंदर.।
बोटावर गणित करते
शाळेत पहिला नंबर.।

काळजामध्ये घुसून खाते
नेहमी गोड गोड बोलून..।
आजीची शिकवण तिला
जणू  शब्द घ्यावे झेलून.।
➖➖➖➖➖➖➖➖
✍️डॉ के घोडके चालती फिरती बाहुली

Sangram Anil autade

# मावळती चालला भास्करा

read more
मावळतीस चालला भास्करा 

मावळतीस चालला भास्करा 
नमन करतो मी रे तुला !
तू आहेस एका जागेशी 
पृथ्वी फिरते गरागरा 
हे विज्ञानाचं तत्वद्यान पटत नाही रे मला
मावळतीस चालला ......   
ऊन वारा पाउस 
याचा आहे तू उद्गाता
आम्ही भूमीची लेकरे
तू तिचाही वाटे पिता 
उन्हाळ्यात तुझ नसणे
हिवाळ्यात तुझ असंन
हवं हवस वाटे मला
मावळतीस चालला .....
मावळण्यान तुझ्या खग घराकडे येती 
पिल्ल त्यांची आनंदाने चिवचिव करती
सांजवेळची चिवचिव मनास प्रसन्न करती
मावळतीचा संधिप्रकाश हवाहवासा वाटे मला
मावळतीस चालला....
लेकरांच्या आशेनं मायेची पावलं घराकडे चालली 
वासराच्या हंभरण्यान गायी गोठ्याकड धावली 
लेकरं किराळली वासर हंभरली 
सर्वास आनंद झाला.
मावळतीस चालला भास्करा 
घरी स्वयापकाची गडबड झाली
गायीची धार काढली
पठण श्लोकाचा करुनी 
दिवा लावला देव्हाऱ्याला
मावळतीस चालला भास्करा 
S.A. # मावळती चालला भास्करा

Uday Barde

ओढ चावली आता faraway

read more
#  ओढ चावली आता  #

गावाकडे राहते  माझी माय मावली आता 
पदराखाली जावे वाटे ओढ चावली आता !!

खेळात  दिवस जाई  झाडाखाली  पारावरच्या
याद काढत असेल का माझी ती सावली आता !!

हिरव्या रानात पक्षी प्राणी बघत  मन रमायचं 
वाटे कुबेर खजिन्याची किल्लीच गावली आता !!

लहान मी  खूप खेळायचो खेळांत खेळण्यांंशी 
पुन्हा  डोळ्यांनी ती बोलेल का भावली आता !!

लुटूपुटू   खेळात मी  राजा  ती  राणी व्हायची 
जिवाची  मैत्रिण ती भेटेल का रावली आता !!

गावी  एकमेंकासाठी  जीव द्यायची  माणसे 
ती माणसे आठवतात पावलो पावली आता !!

पाऊल खूणा  जपणारे  रस्ते  झाले  सिमेंटचे 
माणूसकीची माणसांनीच वाट लावली आता !!

                                   उदय बरडे .नांदेड .

©Uday Barde ओढ चावली आता 

#faraway

Vilas Bhoir

चाललो ज्या वाटेवरी #footsteps

read more
चाललो ज्या वाटेवरी 
सोबत कुणाची नाही
तव सावली स्वतःची
घुटमळे माझ्या पायी

दुर दुर जाते वाट
शोध जगण्याचा घेत 
चालताना दिसे मज
आठवांचा एक श्वेत

नीरव शांत किनारी
सांज गहिवरलेली
पाणावले डोळे माझे
पापण्यांना नीज आली

तिथे विसावले मन 
स्वप्नात रंगूनी गेलो
एक दिवस मी माझा
आज सागराचा झालो

पहाटेचा जल स्वर
सागरी सनसनाट
लाट लाटांवर येता 
सुरू होते तीच वाट

                     ~ विलास भोईर 
                   ( चाललो ज्या वाटेवरी )

©Vilas Bhoir चाललो ज्या वाटेवरी 

#footsteps
loader
Home
Explore
Events
Notification
Profile