Nojoto: Largest Storytelling Platform

New वेळेनुसार Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वेळेनुसार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वेळेनुसार.

    PopularLatestVideo

swara

वेळेनुसार मानस खरंच बदलतात

read more
mute video

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे वाटेवरच्या सावल्या.. #वाटेवरच्यासावल्या #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
दूरवर साथ देतात कधी,कधी क्षणार्धात दुरावतात,
वाटेवरच्या सावल्या वेळेनुसार बदलतात. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?

आताचा विषय आहे
वाटेवरच्या सावल्या..

#वाटेवरच्यासावल्या

Devanand Jadhav

आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब #मराठीकविता

read more
°अशीही फुले तशीही फुले° 

   मोगरा गुलछडी सजवी गजरा 
   पाहुन चाफा होई लाजरा 
   नववर्षाचे तोरण बांधे झेंडू 
   गुलाब केवडा केवडा बावरा 
पारिजात रातराणी गंध दरवळता 
होते जाई जुई अबोली अबोली 
कमळ जास्वंद सुंदर फुलते पण 
सदाफुली सदा कशी बहरलेली 
   तगर चमेली हितगुज करी 
   का कोमेजली बकुळी शेवंती 
   मंदार धोतरा कुठेही फुलतो 
   गुणगान गाते मधुमालती 
वर्षा वर्षात फुलतो सोनटक्का 
जणू याचाच भाऊ शुभ्र तगर 
कर्दळ कण्हेर गोकर्णीही लाजे 
उन्हाळ्यात बहरता गुलमोहर  

{केवडा : केवड्याचे फुल आणि केवढा या अर्थाने 
अबोली : अबोलीचे फुल आणि मुक या आर्थाने
वर्षा वर्षात : वर्षा ऋतूत (पावसाळ्यात) आणि वर्षभराने या अर्थाने 
मंदार : रुई} 


 ✍🏻© •देवानंद जाधव• 
 jdevad@gmail.com 
 9892800137 / 9594423428

©Devanand Jadhav आपल्याला रोज निरनिराळी फुले पहायला मिळतात. काही फुले हारात गुंफली जातात, काही गजऱ्यात गुंफली जातात तर काहींचे तोरण, चादर किंवा बुके, गुच्छ ब

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे विषय - अंतरंगाचे रंग... #अंतरंगाचेरंग हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
अंतरंगाचे रंग कुणी जाणिले,
ओठी एक तर मनी दुसरेच लपविले.
रंग ओळख प्रत्येक रंगांची,
नाही ती फक्त अंतरंगाची.
अंतरंग फुलात असतो पानात ही असतो,
वेळेनुसार नजरेस ही दिसतो.
अंतरंग प्रत्येक गोष्टीसह माणसात ही असतो,
कुणाचे अंतरंग शुद्ध,निर्मळ असते,
तर कुणाच्या अंतरंगी नुसतेच छळ,कपट असते. सुप्रभात सुप्रभात
प्रिय मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे


विषय - अंतरंगाचे रंग... 
#अंतरंगाचेरंग
हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जीवनात महत्वाचं काय ? #जीवनातमहत्वाचंकाय हा विषय यांचा Oms Mandade आहे. #Collab #yqtaai Bes #YourQuoteAndMine #yqmarathiquotes

read more
जीवनात महत्वाचं काय ? क्षणार्धात सांगणे कठीण आहे.
जीवन जगताना समोर आलेली प्रत्येक गोष्ट,
प्रत्येक वस्तू,प्रत्येक अनुभव,प्रत्येक प्रसंग महत्वाचा आहे.
जन्म दिला ती आई महत्वाची,पालन कर्ता बाप महत्वाचा आहे,
शिक्षण दिले म्हणून गुरू महत्वाचे,
समाजाने एक ओळख दिली म्हणून समाज महत्वाचे.
वेळेनुसार बदलत जाता उपयोगात येणारी प्रत्येक वस्तू महत्वाची,
हवा महत्वाची,पाणी महत्वाचे
जगण्यासाठी श्वास महत्वाचा,प्रेमासाठी प्रत्येक जीव महत्वाचा,
आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्वाचा,
अनुभव दिले म्हणून भूतकाळ महत्वाचा,
की उद्या साठी विचार करायला लावणारा भविष्यकाळ महत्वाचा.
जगतोय ज्या स्थितीत तो वर्तमान महत्वाचा
की जे होईल ते बघू हा विचार महत्वाचा.
खूप कठीण आहे जगासमोर प्रपंच मांडणे,
क्षणार्धात जीवनात महत्वाचं काय ते सांगणे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
जीवनात महत्वाचं काय ?
#जीवनातमहत्वाचंकाय
हा विषय यांचा
Oms Mandade आहे.
#collab #yqtaai 
Bes

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? पत्रलेखन कसे सुरु आहे? आज आपण चहा ला पत्र लिहुया. मला खात्री आहे तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चहा प्रे #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी #प्रियचहा

read more
तुझे माझे नाते अतूट आहे,तू प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस माझ्या सोबत आहेस.
लहान होतो जेव्हा मी वाडगा भरून तुला घ्यायचो आणि त्यात चपाती कुस्करून खायचो.
आम्ही दूध वापरत नसल्याने तुझा रंग ही काळा होता दिवस बदलत गेले तसा तू गोरा झालास.
मी ही दिवसागणिक बदललो जसा तू काळा असताना गोरा झालास तसा माझा वाडगा ही आता पेला झाला.
चपाती च्या जागी गोऱ्या चहाबरोबर बटर नि खारी आली जेव्हा जेव्हा नावडते जेवण बनले तेव्हा तेव्हा तुझ्यावरच अवलंबून पावासोबत पोट भरले.
तुझी सवय तर इतकी झाली की दिवसातून दोन वेळेस सोबतीला असणारा तू आता केव्हाही सोबतीला राहू लागलास,सकाळी नि दुपारी सोबत देणारा तू आता रात्री झोपताना ही सोबत देऊ लागलास.
वेळेनुसार तुझ्यात खूप बदल झाले पूर्ण असणारा तू कटिंग झाला नि तुझे अनेक नावं ही झाले.
कुठे तू उकाळा झालास,तर कुठे पिवर झाला कुठे रजवाडी झालास तर कुठे काळा पाणी झालास.
तुझी इतकी सवय झालीय की तुझ्याशिवाय अजिबात करमत नाही ऑफिस ला गेल्यावर जो पर्यंत तुला भेटत नाही कामाला काही सुरुवात होत नाही.
एक मात्र कायम आहे की तुझी सोबत असल्यानेच अंगात एक वेगळीच ऊर्जा आहे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
पत्रलेखन कसे सुरु आहे?
आज आपण चहा ला पत्र लिहुया.
मला खात्री आहे तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चहा प्रे
loader
Home
Explore
Events
Notification
Profile