Find the Latest Status about हरवलेले बालपण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवलेले बालपण.
Rupali sidu gherade
आज जेव्हा लहान मुलांना खेळतांना पाहिलं की वाटत आपणही असंच खेळायचो, बिनधास्त बागडायचो कळत नसेल तरी एकमेकांना समजवायचो तेव्हा ना अपेक्षांच ओझं होत ना जबाबदारीच पुस्तकाच्या सगळ्या पानांत बालपण हे पान खूपच आवडीचं होत हे आज कळलं ©Rupali sidu gherade #बालपण
nisha Kharatshinde
बालपण बालपणीच्या आठवणीत पुन्हा जावेसे वाटते आयुष्य संपेपर्यंत बालपणच रहावे वाटते येणारा प्रत्येक दिवस मित्रांमध्ये जावा वाटते खेळांतील जिंकणे वारंवार अनुभवासे वाटते आईच्या हातचे रोज खावेसे वाटते बाबांच्या भितीने ताईचे ऐकावे लागते शाळेतील जीवन कायम रहावे वाटते मौज मजा मस्ती यातच रमावे वाटते आयुष्यातील संकटांना तोंड देणे नको वाटते जबाबदारी नसलेले ते बालपणच हवेसे वाटते ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde बालपण
Akshay Tayde.
लिहण्यास मन माझे व्याकुळ होत आहे पण सुचत काही नाही शब्द हरवलेच आहे जीवनात, अन आता तीही सोबत नाही हरवलेले शब्द.
Roshan Sagar
हरवलेल्या जगात मी शोधतोय माझ्या स्वप्नांना.. आनंद विसरलो मित्र विसरलो विसरलो रोजच्या होणाऱ्या पार्ट्यांना.... डोळे आज माझे चार भिंती पाहतय.. भविष्याची शहरे त्या नकाशात मात्र शोधतोय.. त्या खुर्चीत शरीर कसे कोंबून बसते.. मन माझे त्यालाही उंच स्वप्न दाखवते ... मन माझे सतत अपेक्षा----- त्या गोष्टीची करते.. मन माझे येथील तुझे दिवस म्हणून सावरते.... अभ्यासिकेतल्या दुनियेला मी माझे मानावे.. त्याच्यात मी कोठे आहे हे मात्र दररोज शोधावे.... हरवलेल्या जगात मी माझे स्वतः शोधावे!!!! ~ ®️Osh@n k S@g@®️ हरवलेले जग