Find the Latest Status about उन्हाळा पावसाळा हिवाळा in english from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, उन्हाळा पावसाळा हिवाळा in english.
Kailas Tidke
हिवाळ्याची सर न येई इतर ऋतूंना../ कुशीत तुझ्या शिरण्यास न लागे दुसरा बहाणा ..// ®कैलास #हिवाळा
Sachin Zanje
हिवाळा आला. दिसला ना तो प्रकाश ना दिसला तो निरभ्र आकाश पहाटेचा दुसरा प्रहर हि सरत होता तरी धुक्याने सोडला नाही आपला हा अट्टाहास. थंडगार थंडीचा जाणवत होता हा शरीरास भास. सरत आहे आता पाऊस म्हणे धुके ,सुरू होतोय आता हा आमचा मास. पाऊसाने दिला असेल तुम्हाला भरपूर त्रास. माझा ही त्यामध्ये थोडाफार म्हणून सकाळी उबदार वस्त्र घातलं जा हमखास. चला तुमच्या भाषेत करतो तुम्हास हाय चार महीनेतरी तर मी आता जात न्हाय कारण हिवाळा मी आता निसर्गाचे सौंदर्य रुप तुम्हाला पाहण्यास घेऊन येत हाय. सकाळीच दिसला हा धुक्याचा पहारा सांगत होता हा पहा हिवाळा सुरू झाला.. कवी - कु सचिन सदाशिव झंजे. हिवाळा आला....
Mahesh Lokhande
उन्हाळा थंडगार वार्याची झूळूक कुठे गेली गरम गरम हवेने भूमीही तप्त झाली चिंब भिजण्याची आस पाखराला थंडगार वारा सांगा कुठे गेला करपली पाने वाढला उन्हाळा दाहीदिशा धावे मृग मृगजळा अंग सारे झाले घामाघूम व्याकूळ झाला जीव तहानेन पाण्यासाठी झाली सूरू वणवण आटल्या विहिरी तलाव पाण्यावीण आहे ते पाणी वापरा जपून पाणी आहे जीवन अमृतासमान पंखा लावुनीही गरम हवा येते लाईट गेल्यावर घालमेल होते कोकम सरबत ज्युस लस्सी थंडावा लिंबूपाणी थंड हवा गारवा थंडगार सावली गुरे शोधू लागली झुळझुळ झर्यालाही किंमत आली द्रोणपाणी भरूनी ठेव पाखराला पाणीदान करूनी जप मानवतेला उन्हाळा
संतोष विजय उईके
■ पावसाळा दावून पाठ पळतो बापास पावसाळा पाण्याशिवाय छळतो शेतास पावसाळा..! झालेत खूप गोळा गगनी थवे ढगांचे कोराच वाटतो हा बकवास पावसाळा..! दुष्काळ पावसाचा शेतात नेमका हा अन् चिंब चिंब करतो शहरास पावसाळा..! शेतातल्या पिकाला वाहून पूर नेतो नजरेत मग बळीच्या नापास पावसाळा..! देतो रुजू बियाणे मातीत वावराच्या.. मग मारतो दडी का हमखास पावसाळा..! दुष्काळ आज ओला हा कोरडा उद्याला करतो असा तसाही उपहास पावसाळा..! आहेस तूच त्याचा आधार पावसा रे देतो सुहास्य अंती कुणब्यास पावसाळा..! ©संतोषकुमार विजय उईके #पावसाळा
Deepak Kambli
लाटा उधाणल्या या गेल्या वरी अशा त्या आल्या धरेवरी मग जिंकून या जगाला - डिके लाटा#पावसाळा
Amita
ग्रीष्म... ग्रीष्माची साक्ष देतो, हा सूर्य तप्त होऊनी वाराही तेव्हा रुसून बसतो, अज्ञात राहूनी.... किरणे प्रखरतात, धवल निळ्या नभातुनी आतपाच्या रेषा तेव्हा, झेपावतात धरेवरी.... साध्वी मही सदैव, सामावून घेते ज्वाळा वृक्षछायेत मिळतो, असीम शीत जिव्हाळा.... करपते काया, स्वेद बिंदू स्त्रवतात तृषार्त होता कंठ, ओंजळी पसरतात.... ग्रीष्म ऋतू हा असा, आगळा वेगळा चटके सोसल्यावर, मग येतो पावसाळा.... अमिता✍️ ©Amita #मराठीकविता #उन्हाळा