Nojoto: Largest Storytelling Platform

New भेटशील तू पुन्हा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about भेटशील तू पुन्हा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, भेटशील तू पुन्हा.

Ashwini wankhade

love MarathiKavita सांग कधी भेटशील पुन्हा #Tuaurmain #NojotoMarathiKavita #मराठीप्रेम

read more
स्वप्ना पलिकडे सांग कधी भेटशील मला
हातात घेऊन हाथ सांग कधी करणारं
तो प्रवास लांब 
एका क्षणाची वाट ती लांब
आयुष्य अर्ध निघून जाते ज्यात 
तुझा सहवास हवाहवासा वाटतो मजला
पण प्रत्येक वेळी तू सोबत नसतो हे खंत मनात
एक ती भेट तुझी जी  स्मरणात आज आहे 
पुन्हा भेटण्याची वेळ हे कदाचित जवळ आहे
पण सांग मजला कधी भेटशील पुन्हा

©Ashwini wankhade #love #NojotoMarathiKavita 
सांग कधी भेटशील पुन्हा 

#Tuaurmain

MANGESH BARSAGADE

भेटली तू पुन्हा

read more
भेटलीस तू पुन्हा 
वाटलं नव्हतं तू भेटशील म्हणून पण अचानक भेटलीस  दोन वर्षांनी पुन्हा... 
मी मन्हालो का मला अशी दोन वर्षे दूर सारलीस 
सांगना काय होता माझा गुन्हा... पण आता तू भेटू नकोस पुन्हा... कारण तू माझ्या ह्रदयात आहेस जीवनात नाही. भेटली तू पुन्हा

Kirti

#परत तू पुन्हा एकदा #poem

read more
mute video

शितल(गार्गी)

येशील का तू पुन्हा?

read more
Alone  येशील का तू पुन्हा मला भेटण्यासाठी,                       निसटलेल्या क्षणाना पुन्हा जगण्यासाठी,                            स्वप्न पहिली जी पूर्ण करण्यासाठी,                         एकमेकांशी भरभरून बोलण्यासाठी,                                तुला कवेत घेवून दूरवर फिरण्यासाठी,                            येशील का तू पुन्हा? येशील का तू पुन्हा?

Lina

कधी मला भेटशील..

read more
प्रेम माझे खरे असेल तर 
तू मला शोधत येशील, 
मी काही न मागता 
तुझी आठवन देऊन जाशील, 
तुझीच केव्हाच झाले रे 
पण जवळ कधी घेशील, 
एक गोड स्मित हास्य 
मला बघून करशील, 
अखेरचा श्वास घेण्याआधी 
का तू मला भेटशील.... कधी मला भेटशील..

Lina

कधी मला भेटशील..

read more
प्रेम माझे खरे असेल तर 
तू मला शोधत येशील, 
मी काही न मागता 
तुझी आठवन देऊन जाशील, 
तुझीच केव्हाच झाले रे 
पण जवळ कधी घेशील, 
एक गोड स्मित हास्य 
मला बघून करशील, 
अखेरचा श्वास घेण्याआधी 
का तू मला भेटशील.... कधी मला भेटशील..

kalyani Pawar.

सांग ना कधी तीला भेटशील? #mohabbatein

read more
mute video

प्रकाश साळवी

बहरतो पुन्हा पुन्हा मी !

read more
बहरतो पुन्हा पुन्हा मी !!

अजूनही आठवांना गोंजारतो पुन्हा पुन्हा मी
जरीही असला गुन्हा तो करतो पुन्हा पुन्हा मी
**
माहीत आहे चराचरात तुच भरून राहीला आहे
तरीही दगडाला पूजतो का पुन्हा पुन्हा मी
**
घायाळ केले तव नयनांनी अन् निघुन गेली
आसक्त आसवे घेऊन रडतो का पुन्हा पुन्हा मी
**
नात्यात रेशमी बंध असावेत रेशमा सारखे
जोडून ठेवतो नात्यास या पुन्हा पुन्हा मी
**
बघ कसा बहरला बाहेर बहावा तुझ्यासारखा
तु असता समवेत कसा बहरतो पुन्हा पुन्हा मी
**
नको वाऱ्याची साथ मजला ना ताऱ्यांची
अजूनही का सांगतो जात पुन्हा पुन्हा मी
**
सत्याने का स्वातंत्र्य मिळाले भारताला ?
तरीही का स्मरतो गांधिजीस पुन्हा पुन्हा मी
**
प्रकश साळवी
बदलापूर - ठाणे
मोबा. ९१५८२५६०५४ बहरतो पुन्हा पुन्हा मी !

प्रकाश साळवी

पुन्हा पुन्हा मी बावरतो..

read more
पुन्हा पुन्हा बावरतो

जेंव्हा जेंव्हा तुझ्या बटांना असा मी सावरतो
मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो
**
ते नयन टपोरे गाल गोबरे निळी सावळी काया
देहावरल्या यौवनानी कशी भारली छाया
रसरसलेल्या या तनुला अलवार आलिंगाया
तव लालगुलाबी मृदुल ओष्ठांना चुंबून चुंबून घेतो

मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो
**
 मंद मंद या किरणांनी मृदुल मंजूळ वाणी
 सांजसकाळी तुझीच आठवण तुझीच गातो गाणी
 या जन्मी ना जरी लाभली तुच होशील राणी
 तव नाजूक तनूला घेता मीठीत हा मी शहारतो

मृदुल करांच्या तव स्पर्शाने पुन्हा पुन्हा बावरतो
**
 पुन्हा पुन्हा मी बावरतो..

ज्ञानेश्वर मुसळे

पडावं प्रेमात तुझ्या पुन्हा पुन्हा. #poem

read more
तु करतीस नुसती खाना खुणा
अनं मी पडावं तुझ्या प्रेमात पुन्हा पुन्हा.

हसत हसत तुझं सामोरी जाणं
हळुवार मनात उतरत येणं
प्रेम असुनही नसल्या सारखं करण
येता जाता माझ्या अवती भवती फिरणं
मग कसं समजवु मी माझ्या मना
अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा.



चंद्र चांदणे  नभ हे सारे तुझे
होऊन पृथ्वी मी घ्यावे कवेत हे जग सारे माझे,
तु यावे त्यात बनुन अलगद कळी
इथे तिथे सारीकडे तु मखमलीची व्हावी फळी,
हे सारे तु समजुन आता घेणा
अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा.


माझे घर दार वाटेवर तुझ्या असती
येणार तु म्हणुनी सारी फुलपाखरे दारी येऊन हसती,
सुर सनई सारे तालात बोलती
बघण्यास तुला जाई जुई चाफा फुलती
आता एकदा तरी भेटुन तु जाणा
अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा.


नको नको तु आता नकोस काही बोलु
चिडीचिप किलकीलाट मनात नको खोली
जमलेच तर तु ये आता
 थोडे नयनातच आपण बोलु,
पुन्हा एक कविता नयनातली शब्दात घालु,
गाजत वाजत येणार असे वचन तु 
माझ्या कवितेला तु देणा,
अनं रोज पडावं तुझ्या प्रेमात मी पुन्हा पुन्हा. पडावं प्रेमात तुझ्या पुन्हा पुन्हा.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile