Find the Latest Status about नावाच्या राशी दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नावाच्या राशी दाखवा.
Jay
ज्या गावाच्या नदीला पुल नसतात, त्या गावाच्या मुलांना पोहणं शिकवावं लागत नाही.
कवी - के. गणेश
हल्ली संगणकावर वाचनाचे बदल नवे घडू लागले.. साहित्यातले शब्द काही पुस्तकामध्ये रडू लागले..! @kganesh काळाच्या ओघात..
patu
तो येणारा वारा भरभरून ,थंडगार सुटणारी हवा, टप टप पडणारे पावसाचे थेंब, अगदी मन घाबरे होऊन जाते. प्रेमा चा हि वारा भरभरून येतो ,थंडगार सुटणाऱ्या प्रेमाच्या भावना, पटपट पडणारे प्रेमाचे स्वप्न ,अगदी मन उत्साहित होऊन जाते, पाऊस येऊन गेल्यावर सगळीकडे शांतता वाटते .तसेच प्रेमात ही एक व्यक्ती निघून गेली की सगळं शांत झाल्यासारखं वाटतं पावसाच्या भावना
Dr Mangesh Kankonkar
तलावाच्या काठावर, मी अनेकदा येते मनसोक्त विहार, मी वाऱ्यासंगे करते तासन् तास तलावाकडे, एकटक बघत राहते मनातल्या गुजगोष्टी, त्याच्याकडे मांडत जाते निळेशार पाणी तलावाच, संथपणे वाहत राहत विचारांनी भरलेलं डोक, क्षणातच शांत होत ती पक्षांची किलबिल, जणू काही सांगू पाहते मनाच्या कोपऱ्यातील, आठवणी जागवून जाते धावपळीच्या जीवनात, मन खुप थकुन जातंं जबाबदऱ्यांच्या ओझ्याखाली, ते मात्र घुसमटून जातं मन मोकळ करायला, सोबत मात्र कोणीच नसतो तेव्हा या तलावाच्या काठावर, मित्र माझा निसर्ग असतो ©Dr Mangesh Kankonkar तलावाच्या काठावर
अश्लेष माडे (प्रीत कवी )
ती प्रीतीची रात्र, तो मिठीतला बहर ढगाचा गडगडाट व चमकनाऱ्या विजेचा प्रकाश त्या भयाण अंधारात, तीही चिंब मीही चिंब आणि दोघांच्या नजरेत, प्रेमाचे प्रतिबिंब तो तिच्या गालावरचा पडणारा ओला थेंब आणि ती पावसाची ओली सर, दोघांचे ओठावर ओठ आणि मनही अधीर, तेव्हा मनात हेच वाटायचं की, हा येणारा प्रेमाचा पाऊस, कधीच न थांबावं. आणि आम्ही दोघेही नेहमी, अशाच पावसात चिंब भिजावं, ह्या पावसात इतकं बेधुंद होऊन जावं की, अनुभवलेले हे पावसाचे क्षण आम्ही दोघांनी कधीच न विसरावं.... (प्रीत ) पावसाच्या आठवणी
Durga Deshmukh
आल्या पावसाच्या सरी हिरवी झाली डोंगर दरी सडा टाकुन फुलांचा दोन्ही हातानी सुगंध भरी तुझ्या आठवणीचा पाऊस डोळ्यातुन वहात रहाते धडधड वाढती ह्दयाची व्याकुळ होऊन वाट पहाते तुझ्या हाताचा रे स्पर्श सरीचा कोसळला थेंब तुझ्या प्रेमान भिजुन ओल झाले अंग अंग पुन्हा येईल भेटायला इतकेच मला दे दान आपल्या प्रेमाचा पाऊस फुलविल बाग छान दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh आल्या पावसाच्या सरी
somnath gawade
चुकीचा 'दाखला' देऊन कुणी 'दिशाभूल' करीत असेल तर त्याच्या शाळेचा 'दाखला' काढून त्याच्या हातात द्यावा.🤣😂 #दाखला