Nojoto: Largest Storytelling Platform

New राजसा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राजसा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राजसा.

Related Stories

    PopularLatestVideo

Rajendra Singh Rajsa

राजसा-का-अंदाज

read more
इतने गोर से ना पढा करो स्टेटस मेरे 

इनमे इश्क़ का नशा है मोहब्बत हो जायेगी 

राजसा-का-अंदाज #NojotoQuote राजसा-का-अंदाज

Rajendra Singh Rajsa

राजसा-का-अंदाज

read more
वक़्त ने बेबस ओर मजबूर बना दिया "राजसा"

वरना आदमी हम भी बड़े काम के थे

राजसा-का-अंदाज #NojotoQuote राजसा-का-अंदाज

Rajendra Singh Rajsa

को याद करता है,,,,,,,,"राजसा "

read more
खुद का दर्द बयाँ करते है जमाने वाले 
दूसरो के दर्द की क्या परवाह उनको 
कोन याद करता है "राजसा"दर्द तेरा
खुद से ही फुरसत नही है  जिनको
राजसा-का-अंदाज  #NojotoQuote को याद करता है,,,,,,,,"राजसा "

Shilpa ek Shaayaraa

प्रिय राजसां, प्रेमपत्र लिहायचेय मला. माझे प्रेम एका पत्रामध्ये व्यक्त करायचे आहे मला, काही शब्द माझे प्रेम खरंच तुझ्यापर्यंत पोहोचव #Talk #freebird #BROKEN_BUT_BEAUTIFUL #ShilpaSalve358 #Shilpa_ek_Shayaraaa #Ramta_Jogi_Special #writtingmoods #strugling_life

read more
प्रिय राजसां,
        तू यावास हळूवार सरी सारखा, बेभान होऊन बरसावस आणि मी तुझ्यात मनसोक्त भिजावं, गारठावणारी थंडी असेल तर माझं पांघरुन तूच व्हावं, ऊन-पाऊस,वादळ-वारा सारं काही मी तुझ्यासोबतच सोसावं. अशी साधी सरळ माफ़क अपेक्षा आहे माझी. त्याच वेळी उन्हामध्ये तुझी मी सावली होईल, पावसामध्ये तुझी छत्री होईल, वादळ वा-यातही तुझी मी साथ देईल याची ख़ात्री देते तुला.. हां थंडीमध्ये मात्र माझे हाल बेहाल असतात म्हणुन तुझे तुलाच मैनेज करावे लागेल त्यासाठी आधीच सॉरी.
         Romatism च्या नावावर मला काहीच येत नाही. प्रणयामध्येही माझे Knowledge शुन्य मानायला हरकत नाही. म्हणुन प्रेमपत्रामध्ये नेमकं काय लिहावं ते कळतच नाहीये. पण हो Romance जरी मला कळत नसला तरी तुला बोअर मात्र मी होऊ देणार नाही. तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण एक Celebration असेल याची 101% Guarantee आहे. तुला हवं तसं- हवं ते करेल पण माझ्या माझ्या पद्धतीने.. Sorry पण तुला हवं तसं, हवं ते करताना मी माझीच असेल. मी स्वतःला बदलणार नाही.
             तुला आवडत असेल तर मी साड़ी ही नेसेन. पण ती नेसवून देणे आणि मी पडू नये म्हणुन माझा हात धरून चालणे ही जबाबदारी तुझी राहील. तुला क्रिकेट किंवा GOT किंवा Netflix बघायचे असेल तर तू खुशाल बघ पण हो पहिल्याच Season मध्ये मी कोणतीही Web Series बघणार नाही म्हणुन मला force ही नको करूस. मला Movies बघायला आवडतात. तू सोबत आलास तरी किंवा नाही आलास तरी मी त्या बघणार. अर्थात Theatre ला जाऊन.
         थोडं तू, थोडं मी Adjust करुयात आणि आयुष्याला नवं रूप देऊयात. काय म्हणतोस..? 

                                                                                                         - तुझीच

©#Shilpa_ek_Shaayaraa प्रिय राजसां,
        प्रेमपत्र लिहायचेय मला. माझे प्रेम एका पत्रामध्ये व्यक्त करायचे आहे मला, काही शब्द माझे प्रेम खरंच तुझ्यापर्यंत पोहोचव

Sangeeta Kalbhor

यावी वेळ.. तू नेशील का त्या दूर....च्या गावी मला मखमली पायघड्यावरुन एकटक बघत बसुया एकमेकांना अलगद धरुन घालावास विळखा असा की #शायरी

read more
यावी वेळ..

तू नेशील का 
त्या दूर....च्या गावी मला
मखमली पायघड्यावरुन
एकटक बघत बसुया
एकमेकांना अलगद धरुन
घालावास विळखा असा की
गलितगात्रे सुखावतील
नयनातील एकेक भाव
आपसूक हो म्हणतील
धरावास हुंदका ओंजळीत
टिपून घ्यायला अलगद
मीही सरसावेन पुढेपुढे
सावकाश तुला बिलगत
खट्याळ व्हाव्यात जाणीवा
श्वासांचा बसवून मेळ
कधी ,कधीतरी राजसा
यावी रे ,यावी तीही वेळ.....

मी माझी.....
27/01/2023

©Sangeeta Kalbhor यावी वेळ..

तू नेशील का 
त्या दूर....च्या गावी मला
मखमली पायघड्यावरुन
एकटक बघत बसुया
एकमेकांना अलगद धरुन
घालावास विळखा असा की

RJ कैलास नाईक

तू धुंद धुंद वारा तू थंडगार शहारा कोसळताना वाटे तू पाऊसधारा ॥धृ॥ शब्दांनी तुझ्या होई मी चिंब राजसा का वाटे मजला तू असा रे हवा हवासा कधी

read more
तू धुंद धुंद वारा तू थंडगार शहारा
 कोसळताना वाटे तू पाऊसधारा ॥धृ॥

शब्दांनी तुझ्या होई मी चिंब राजसा 
का वाटे मजला तू असा रे हवा हवासा 
कधी उनाड होई तू कधी शांत सागरतळ
अवखळ विलासतोस भासे मज न्यारा।।१॥

कधी भासे मज तू ग्रीष्माची झळ 
दाह होऊन करितो माझा रे छळ
तू समीप नसता उगा आठवणींची वर्दळ
विरहात मांडून बसते मी सख्या पसारा।।२॥

युगा युगाची साथ अन् नाते आपले
गुंफून श्वासात श्वास काळजात जपले
कवेत घेता तू मजला भान रे हरपले
नि दरवळला मिलनाने आसमंत सारा।।3॥
           RJ कैलास तू धुंद धुंद वारा तू थंडगार शहारा
 कोसळताना वाटे तू पाऊसधारा ॥धृ॥

शब्दांनी तुझ्या होई मी चिंब राजसा 
का वाटे मजला तू असा रे हवा हवासा 
कधी

Sarita Prashant Gokhale

सुमंदारमाला लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे अता जीवनाची निराशा पळ #मराठीकविता

read more
सुमंदारमाला

लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे
अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या भोवताली सुखाच्या सरी
सख्या घेत आहे तिथे मी उभारी, सुखाच्या दिशेने मनाशी जुळे
दिशा धुंद झाल्या पुन्हा सांजवेळी वितळले सख्या मी पुन्हा अंतरी 

तुला हाक देता मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली
नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजिरी
तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली
खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी

नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा
छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा
बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी
तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग साऱ्या मनीच्या कथा

©Sarita Prashant Gokhale सुमंदारमाला

लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे
अता जीवनाची निराशा पळ

Sarita Prashant Gokhale

वृत्तगंगा २४ कॅरेट उपक्रम क्रमांक-- १० सुमंदारमाला वृत्तलय लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा तुझ्या सोबतीच्या युगाची क #मराठीकविता

read more
वृत्तगंगा २४ कॅरेट
उपक्रम क्रमांक-- १०
सुमंदारमाला वृत्तलय

लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची कहाणी यशाच्या किनारी नव्याने मिळे 
सख्या घेत आहे तिथे मी उभारी सुखाच्या दिशेने मनाशी जुळे
अता जीवनाची निराशा पळाली तुझ्या पास आल्या सुखाच्या सरी
बसावी नव्याने घडी मोडलेली करू पावलांची सख्या चाकरी

नको दूर जाऊ अशा संधिकाली तुझ्या प्रेम वाटेत मी साजरी
खुले ठेव डोळे शराबी नशीले मनाच्या प्रितीची कळी लाजरी
छुप्या अंतराला तुझ्या जाणते मी नको आठवू त्या जुन्या तू व्यथा
तुझ्या जीवनाच्या प्रवासामधे मी मला सांग सा-या मनीच्या कथा

नको आठवाया विषारी शहारे नसे शांतवाया ठसे राजसा
अता पेलवेना निनावी तडाखे जुन्या काळजाला शोध माणसा
रहा पास माझ्या मला साथ दे तू हवा धुंद झाली निशा रंगली
तुलाही मलाही मनी ओढ वाढे इशारे नशीले तनू दंगली

स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा-- सोलापूर

©Smita Raju Dhonsale वृत्तगंगा २४ कॅरेट
उपक्रम क्रमांक-- १०
सुमंदारमाला वृत्तलय

लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची क

CR.स्मिता राजू ढोनसळे
नान्नज, जिल्हा-- सोलापूर

©Smita Raju Dhonsale वृत्तगंगा २४ कॅरेट
उपक्रम क्रमांक-- १०
सुमंदारमाला वृत्तलय

लगावली--लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगागा लगा

तुझ्या सोबतीच्या युगाची क
loader
Home
Explore
Events
Notification
Profile