तुझी साथ हवी होती मला
वाऱ्या सारख पळताना,
पावसात भ
  • Latest
  • Video

"तुझी साथ हवी होती मला वाऱ्या सारख पळताना, पावसात भिजताना, संधीचा निरागस अबोल करताना, आणि उन्हात सावली पहाताना..... तुझी साथ हवी होती मला दुःखात रडताना, आनंदाने हसताना, हरवलेल्या मला शोधताना, आणि पुन्हा त्याच अस्मितेच भान देताना..... तुझी साथ हवी होती मला तुझ्यावर खूप प्रेम करताना, जीवनभर हात मागताना, आयुष्याचे स्वप्न पहाताना, आणि फक्त तुला माझंच करताना..... तुझी साथ हवी होती मला निखळ तुझ्यात रुजताना, खिळखिळून त्रासही देताना, आपलसं करवून समजवताना, आणि नाविन्यपूर्ण मनःशांती देताना....... तूझी साथ हवी होती मला खूप काही बोलताना, न बोलता ही समजून घेताना, तुला सुरात गाताना, आणि ते सूर आपलेसे करताना.... खरच ,तुझी साथ अजूनही हवी होती मला नेहमी माझंच चुकलं म्हणताना, सांभाळून नेहमी माफ़ही करताना, प्रेमानं मारताना, आणि ते प्रेम नेहमी सांभाळताना........ नेहमी तुझीच साथ हवी होती मला............. :अक्षय देशमुख😘"

तुझी साथ हवी होती मला
वाऱ्या सारख पळताना,
पावसात भिजताना,
संधीचा निरागस अबोल करताना,
आणि उन्हात सावली पहाताना.....

तुझी साथ हवी होती मला
दुःखात रडताना,
आनंदाने हसताना,
हरवलेल्या मला शोधताना,
आणि पुन्हा त्याच अस्मितेच भान देताना.....

तुझी साथ हवी होती मला
तुझ्यावर खूप प्रेम करताना,
जीवनभर हात मागताना,
आयुष्याचे स्वप्न पहाताना,
आणि फक्त तुला माझंच करताना.....

तुझी साथ हवी होती मला
निखळ तुझ्यात रुजताना,
खिळखिळून त्रासही देताना,
आपलसं करवून समजवताना,
आणि नाविन्यपूर्ण मनःशांती देताना.......

तूझी साथ हवी होती मला
खूप काही बोलताना,
न बोलता ही समजून घेताना,
तुला सुरात गाताना,
आणि ते सूर आपलेसे करताना....

खरच ,तुझी साथ अजूनही हवी होती मला
नेहमी माझंच चुकलं म्हणताना,
सांभाळून नेहमी माफ़ही करताना,
प्रेमानं मारताना,
आणि ते प्रेम नेहमी सांभाळताना........

नेहमी तुझीच साथ हवी होती मला.............

:अक्षय देशमुख😘

 

4 Love