Nojoto: Largest Storytelling Platform

Best शब्दरंग Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best शब्दरंग Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 111 Stories

Nilbrothers

Shankar Kamble

...गझल...
बोलू कुणांस आता? शब्द माझे हरवलेले
समजेल कोण भाषा? भाव अर्थ गोठलेले

पायांस रोखणारा उभा धाक उंबऱ्याचा
मुक्या पैंजणा आडोशी किती घाव वेचलेले

निढळी करांस ठेवून वाट पाहते अधीरा
ढळली उदास सांज घाट संयमी बुडलेले

जपतो कशांस आता?कप्प्यात मोरपीस
तुटले उगांच मोती धाग्यात माळलेले

चुकले चुकार कोठे? कळपात वासरांच्या
गलबलून जीव आला हंबऱ्यात बोललेले

नसणार मी उद्याला भास कोरडा असेल
छळले स्वतःस मीही नजरेत बोचलेले

गावातला जुना तो आज पार पोरका भासे
पिकली गळून गेली पानांत शोधलेले

©Shankar Kamble #Foggy #gazal #gazals #शब्द #शब्दरंग #विरह_वेदना #प्रेम

Shankar Kamble

जड झाले पाय जरी वाट तरी चालतो आपण
खांदेपालट करून जराशी ओझे ‘तेच‘ वाहतो आपण...

मी नाही बरे त्यातला ’बरे’ तेच सांगतो आपण
कोण बरोबर? कोण चुकीचा? खरे कधी वागतो आपण?

अपराधी तर इथेच सारे गुन्हा कोणता करतो आपण?
मूकपणाने अन्यायाचे गर्भ पोसतो उदरी आपण... 

नव उड्डाणे आव्हानांची रोज नवी आखतो आपण
जगण्यामधल्या आनंदाचा गंध कधी भोगतो आपण?

कवेत घेण्या आकाशाला पंख पसरतो सारे आपण
कर्तव्याचा भारच इतका जमिनीपुरते उरतो आपण...

प्राक्तनाचे भोग अकल्पित अवधाने रांधतो आपण
भोगाची जोडून वल्कले काय उसने सांधतो आपण?

रंगमंच हा जीवनाचा किती नाटके करतो आपण
पडदा पडता एकदाचा अंक नवा जोडतो आपण...

©Shankar Kamble #Flower #गझल #शब्दरंग #शब्द #गजल #शब्दांचेअवजार #जगणे_येथे_महाग_झाले #जग

Shankar Kamble

शब्दांना यावी धार इतकी* 
*शब्दच व्हावे शस्त्र आता*
*खोडून काढू जीर्ण ओरखडे*
*शब्दांनी घडवू झुकवू माथा*

*शब्द म्हणजे कुणां वाटतो*
*भास प्रपंच अक्षरांचा*
*धागा धागा जुळूनी येतां*
*ध्यासपर्व हा परिवर्तनाचा*

*नका समजू दुबळे इतके*
*असह्य आणि केविलवाणे*
*पेटून उठली किती मस्तके*
*शब्दांच्या केवळ जाणीवेने*

*पिचलेल्या मनगटांत भरते*
*बळ पोलादी शब्दाने*
*मुक्यासही फुटते मग वाचा*
*बंड चेतते शब्दाने*

*सखे सोबती दीपस्तंभ हे*
*वाट दाविती जगण्याची*
*अमृताहुन मधाळ गोडी*
*कधी कठोरता वज्राची*

*नव्या युगाच्या नव्या पाईका*
*शब्दवसा हा हाती घे*
*नकोस गुंफु भ्रमिक कल्पना*
*जग वास्तवाचे टिपून घे*

©Shankar Kamble #शब्दांचेअवजार #शब्द #शब्दरंग #आक्रोश #उठाव #बंड #शब्दवेडा #परिवर्तन 

#Light

Nilbrothers

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile