मला काही नको रे देवा ! मला माझा बाप हवा रे देवा ! मला नकॊ आशिर्वाद ! मला हवा माझ्या डोक्यावर माझ्या बापाचा हात ! बापा होतास तूम्ही नव्हती कसलीच काळजी ! आयुष्याच्या या वळणावर साथ तुमची कशी हो सुटली ! आता उरल्या बालपणीच्या आठवणी ! आठवणीने तुमच्या डोळे येतात भरून ! शिकविले तुंम्ही एकठे लढायला भीती कुणाची वाटली नाही ! आज मात्र कळत नाही शक्ती माझी मलाच साथ का देत नाही ! देवा का रे रूसला तु माझा आधारच नेलास तु ! एकच माझं ऐकशील कारे माझ्या बापाला मला परत करशील कारे !🙏