मला साथ देशील ना आयुष्यभर की परक्या मुलासाठी नटशील की, तुझं आयुष्य माझ्या नावावर करण्यासाठी ठाम राहून सगळ्या जगाशी झटशील... येणार तुला पाहुणे पाहायला ही वार्ता ऐकवून माझं हृदय फाडशील की, कोणत्याही परिस्थितीत मला मिळवण्यासाठी सगळ्यांसमोर ढसाढसा हात जोडून रडशील... बघ शेवटी तुला काय हवंय माझ्याशी लग्न करून माझं प्रेम कमावशील की, दुसऱ्याच्या हातात हात देऊन माझं प्रेम अनं मलाही कायमचं गमावशील... शिमग्याची बोंब दोन दिवस असेल म्हणून सगळं बाजूला ठेवून हे नातं निभावशील? की, नाहीच जमलं मला शेवटी तुझी होणं शेवटी असं म्हणत मला कायमचं गमावशील?.... ©अश्लेष माडे (प्रीत कवी ) मराठी प्रेम कविता बेस्ट कपल स्टेटस लव्ह स्टेटस