Nojoto: Largest Storytelling Platform

शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे घेऊन कवेत म

शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे
घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे

चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा
स्वप्न पुन्हा नव्याने माझ्यावर कधी न रुसावे

गंधाळू दे भाववेडे क्षण तुझ्या ग मनात 
तोडून टाक ते बंध सारे वैफल्याचे फसवे

थरथरत्या गात्रातूनी प्रीत रोम रोमी संचारुन
 प्रेम वर्षावात चिंब चिंब मी होऊन जावे

आठवात साठते डोळ्यांत नकळत पाणी
पापण्यांच्या जाणिवात प्रतिबिंब तुझे असावे

पहाटेला ये फुलून अशी पारिजातकासम
सांजवेळी अस्तित्वाने जीवन उजळावे

ओळींचा साज ग तू शब्दांचा शृंगार तू 
कवितेत माझ्या तू नवं वधुसम मिरवावे
          RJ कैलास #शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे
घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे

चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा
स्वप्न पुन्हा नव्याने माझ्यावर कधी न रुसावे

गंधाळू दे भाववेडे क्षण तुझ्या ग मनात 
तोडून टाक ते बंध सारे वैफल्याचे फसवे
शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे
घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे

चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा
स्वप्न पुन्हा नव्याने माझ्यावर कधी न रुसावे

गंधाळू दे भाववेडे क्षण तुझ्या ग मनात 
तोडून टाक ते बंध सारे वैफल्याचे फसवे

थरथरत्या गात्रातूनी प्रीत रोम रोमी संचारुन
 प्रेम वर्षावात चिंब चिंब मी होऊन जावे

आठवात साठते डोळ्यांत नकळत पाणी
पापण्यांच्या जाणिवात प्रतिबिंब तुझे असावे

पहाटेला ये फुलून अशी पारिजातकासम
सांजवेळी अस्तित्वाने जीवन उजळावे

ओळींचा साज ग तू शब्दांचा शृंगार तू 
कवितेत माझ्या तू नवं वधुसम मिरवावे
          RJ कैलास #शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे
घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे

चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा
स्वप्न पुन्हा नव्याने माझ्यावर कधी न रुसावे

गंधाळू दे भाववेडे क्षण तुझ्या ग मनात 
तोडून टाक ते बंध सारे वैफल्याचे फसवे

#शब्द दे उधार मला ज्यात भाव तुझे दिसावे घेऊन कवेत मला तू श्वासात अलगद गुंफावे चोरटीच का होईना कटाक्ष टाक ना एकदा स्वप्न पुन्हा नव्याने माझ्यावर कधी न रुसावे गंधाळू दे भाववेडे क्षण तुझ्या ग मनात तोडून टाक ते बंध सारे वैफल्याचे फसवे