Nojoto: Largest Storytelling Platform

हवं रे असं कुणीतरी... हवं रे असं कुणीतरी... कधी न

हवं रे असं कुणीतरी...

हवं रे असं कुणीतरी...
कधी नाराज झालो तर त्याच्या कुशीत जायला
 हातात हात घेऊन मनातल सारं काही सांगायला
रोजच्या घडामोडी फोन वर सांगायला.

हवं रे असं कुणीतरी...
जो हक्कानी लाड पुरवेल
 लहान मुला प्रमाण हट्ट पुरवेल 
मनसोक्त हसेल मी आणि तो एकटक फक्त मला बघेल

हवं रे असं कुणीतरी...
ज्याच्याशी बोलून सारं दुःख विसरेल
त्याला भेटण्यासाठी विरह माझा थांबेल
त्यांनी मारलेली हाक माझ्या नावाची मला आनंदाने गोंधळून टाकेल

हवं रे असं कुणीतरी...
ज्यांच्याकडून अपेक्षा खूप नसेल 
पण तो माझा आहे हा गर्व मला नेहमी असेल
त्याला भेटण्याची ओढ असेल
जिथे थोडी भांडण असेल, पण मनात प्रेम असेल

हवं रे असं कुणीतरी...
 आई-वडीला प्रमाण काळजी घेणारा
चुकल तिथे सावरायला
अंधारात उजेडाचा हात द्यायला
डोळ्यात अश्रू आल्यावर 
आपल्या साठी गहिवरताना.

हवं रे असं कुणीतरी...
खुश आहेस का हे विचारायला
मी आहो ना असं बोलणारा

नाराज राहून बघा लोक जवळ हि येणार नाही हो
तुम्ही तुमचं दुःख लपून हसा लोक आपसूक जवळ येतील
एक वेळ अशी येते जेव्हा कोणीतरी आपल असावं अशी जाणीव होते
बोलायला लाखो असतील पण तो एक व्यक्ती नसतो तेव्हा खंत वाटते 
की आपल्याच नशिबात हे सारं काही का नाही??

©Damini turare #GateLight