Nojoto: Largest Storytelling Platform

कुणांस ठाऊक प्रवासात या मुक्कामाचे गाव क

कुणांस ठाऊक प्रवासात या
          मुक्कामाचे गाव कोणते?
दोन घडीची सोबत संगत
         अळवावरचे पाणी सरते..

कठीण परीक्षा आयुष्याची
         सहज ,सोपे नसते काही
पान वेगळे, धडा वेगळा
       वेळ नी उत्तर समान नाही..

वेदनेचे गीत बनवूनी
     कुणी मुसाफिर आळवत जातो
रडतो ,कुढतो, उगाच चिडतो
       वाट फिरूनी तीच चालतो..

खपली उडता भकास भिंती
           एक औकळा घरास देई
चुकता गणती सुखदुःखाची
          हाती शिल्लक उरते काही..?

एक पायरी चढण्यासाठी
        उन्हास त्या सावली केले
हात पोळले तरीही माझे
         फितूर काजवे मलाच झाले..

उगाच चिंता, चिकार गुंता
          किती उगाळू तोच कित्ता
मावळत्या सूर्याच्या साक्षी
          बहर येईल पुन्हा आता..

©Shankar Kamble #celebration #जीवन #जीवनगाणे #जीवनअनुभव #जग #प्रवास #प्रवासी #जगणे #माणूस
कुणांस ठाऊक प्रवासात या
          मुक्कामाचे गाव कोणते?
दोन घडीची सोबत संगत
         अळवावरचे पाणी सरते..

कठीण परीक्षा आयुष्याची
         सहज ,सोपे नसते काही
पान वेगळे, धडा वेगळा
       वेळ नी उत्तर समान नाही..

वेदनेचे गीत बनवूनी
     कुणी मुसाफिर आळवत जातो
रडतो ,कुढतो, उगाच चिडतो
       वाट फिरूनी तीच चालतो..

खपली उडता भकास भिंती
           एक औकळा घरास देई
चुकता गणती सुखदुःखाची
          हाती शिल्लक उरते काही..?

एक पायरी चढण्यासाठी
        उन्हास त्या सावली केले
हात पोळले तरीही माझे
         फितूर काजवे मलाच झाले..

उगाच चिंता, चिकार गुंता
          किती उगाळू तोच कित्ता
मावळत्या सूर्याच्या साक्षी
          बहर येईल पुन्हा आता..

©Shankar Kamble #celebration #जीवन #जीवनगाणे #जीवनअनुभव #जग #प्रवास #प्रवासी #जगणे #माणूस