Nojoto: Largest Storytelling Platform

आई बोट धरून चालवते तशी इंटरव्ह्यूलाही पाठवते आई स

आई

बोट धरून चालवते तशी इंटरव्ह्यूलाही पाठवते
आई स्वतः त्रास घेऊन आपल्याला घडवते
चार भिंतीत राहून जग दाखवत असते
पहिली गुरु आणि मित्र आईच असते

ती रागावण्याची भीती आयुष्यभर वाटत राहते
तिच्या त्या रागातही आपलीच काळजी राहते
आपल्या सर्व चुकांसाठी तिथे क्षमाच असते
आईपेक्षा देवपण वेगळे ते काय असते

या गर्दी मध्ये एकटेपण नेहमी जाणवते
मोठे झालो तरी दुःखात तीच आठवते
काही लागलं की आईकडेच धाव असते
अनोळखी शहरामध्ये हक्काचं ती गाव असते

आपल्या नुसत्या चाहुलीने तिचे आयुष्य फुलते
जन्मण्या आधी पासून आपल्यावर प्रेम करते
जग बघण्या आधी आपलं जग असते
ते सुंदर जग म्हणजे आई असते

~अनजान~ On the occassion of mothers day few lines in my Mother tongue Marathi. Happy Mother's Day 😊🙏 #happymothersday #happymothersday❤️ #marathiquotes #marathikavita #marathiwriter #marathipoem #marathipoems #aai
#mothers_day