अगं सांगना, किती रडत बसायचं, किती आर्जव करायचं, किती हात जोडायचं, पाय पडायचं, तुझं प्रेम मिळवण्यासाठी मी अजून किती लहान व्हायचं.. इतकी कशी पाषाण हृदयी तू? तुला खरंच का माझं प्रेम नाही कळायचं, बरोबर आहे ना, सहज मिळतंय ना तुला प्रेम म्हणून त्याचे महत्व तुला नाही कळायचं, मी किती बदलायचं, किती त्याग करायचं अगं तुझं प्रेम मिळवण्यासाठी विसरलो मी मनाप्रमाणे स्वतःसाठी जगायचं, पण थकलो गं मी पार आता, अजून कसं प्रेम मी सिद्ध करायचं. यातना तर भरपुर दिलंस मला अजून होऊ दे सहन करणार मी, प्रेम करून चूक मीच केलं ना, पण म्हणून ठरवलं आता तुला प्रेमाची भीक नाही मागायचं तुला प्रेमाची भीक नाही मागायचं... (प्रीत ) प्रेमाची भीक नाही मागायचं