पर्व तुडवत चाललो अन् कोरडी नदी प्यायलो भंगलेल्या मैफिलीत मी भैरवी नंतर गायलो... पेटल्या होत्या मशाली मस्तकी केंव्हा कधी विझवूनि सार्यास मी ही शांत आतुन जाहलो... पुर्णत्वाची जाण माझ्या उद्गारातही ना दिसे!! प्रश्नांना सांभाळणार्या उत्तरांवरी मी हासलो... जर कधी दिसलो कुठे तरी साद ना द्य़ावी कुणी मी स्वतःला स्वतःपासून टाळायला लागलो... ©Swapnil Shantaram Jadhav #Pennings #Swapys_Diaries #Feelings #Powwr_of_Words