बोलत ती ही नाही बोलत मी ही नाही, निशब्द ती ही निशब्द मी ही, वाट ती पण बघते वाट बघतो मी ही, मनातलं मनात ठेवते ती, ते शब्दात उलगडतो मी, नातं ती पण जपते नातं जपतो मी ही, भावना तिला ही आहेत भावना मला ही, भावना व्यक्त करतो मी, भावना लपवते ती, आंतरिक आमचं प्रेम जपते ती ही जपतो मी ही, दिवस संपतो रात्र ही संपते, मनात असतं बोलायचं खूप, पण अबोल असतं सगळं काही..... (प्रीत ) अबोल सगळं काही