आई आई तुझ्याबद्दल लिहितांना डोळ्यात येते पाणी रानावनात लेकरांसाठी तु चालतेस अनवाणी मी दुनियेत यायच्या आधीपासुनच माझ्यावर प्रेम करायला लागलीस आई असूनही नेहमी मैत्रीणीसारखीच वागलीस कष्ट करून आल्यावरही जवळ हसतच आलीस रागानी मारुन मला तु स्वतःच रडलीस यशाची माझ्या पहिली गुरुकिल्ली झालीस हृदय हळव संकटात मात्र कठोर बनलीस स्वप्न तुझे मागे ठेवीत विचार माझा करीत होतीस उन्हातान्हात नाजुक हातांना घाव तु घालीत गेलीस फुलासारख्या हृदयाला तु कोमेजु दिली नाहीस ग्रंथ शास्त्राचाही टिकणार नाही 'आई' तुझ्या समोर छत्तीस कोटी देवही करते नमन 'आई' तुझ्या समोर ।।२।। #damini