Nojoto: Largest Storytelling Platform

आयुष्याचं पुस्तक लिहीताना...! आयुष्याचं पुस्तक ल

आयुष्याचं पुस्तक लिहीताना...! 

आयुष्याचं पुस्तक लिहीताना...
स्वकमाईच्या अनुभवाची लेखणी हाती...! 
भले बुरे जाणताना.. 
पाठीशी होती गुरू माझी मायमाती...! 
संकटांशी दोन हात करताना... 
ना मी थकलो ना थिजली माझी छाती...! 
आपले परके पारखताना... 
गळून पडली होती अनेक मायेची नाती...! 
पाठीवरच्या जखमा पाहताना... 
आपल्यांच्याच हाती होती समशेरींची पाती ..! 
विश्वासाला प्रश्न विचारताना... 
मनात होती अविश्वासाची अनामिक भीती...! 
पण विश्वासाचं उत्तर ऐकताना... 
डोळे ओलावले अन् श्वासांची वाढली गती...! 
ऐका उत्तर सांगतो सर्वांना... 
अविश्वासांनं गळा कापताना समशेर असते भरोश्याच्याच हाती...! 
-संतोष लक्ष्मण जाधव.

©Santosh Jadhav #आयुष्याचं पुस्तक लिहीताना.. Vinod Ganeshpure Sewli Karmakar Divya Joshi Madhavi Choudhary
आयुष्याचं पुस्तक लिहीताना...! 

आयुष्याचं पुस्तक लिहीताना...
स्वकमाईच्या अनुभवाची लेखणी हाती...! 
भले बुरे जाणताना.. 
पाठीशी होती गुरू माझी मायमाती...! 
संकटांशी दोन हात करताना... 
ना मी थकलो ना थिजली माझी छाती...! 
आपले परके पारखताना... 
गळून पडली होती अनेक मायेची नाती...! 
पाठीवरच्या जखमा पाहताना... 
आपल्यांच्याच हाती होती समशेरींची पाती ..! 
विश्वासाला प्रश्न विचारताना... 
मनात होती अविश्वासाची अनामिक भीती...! 
पण विश्वासाचं उत्तर ऐकताना... 
डोळे ओलावले अन् श्वासांची वाढली गती...! 
ऐका उत्तर सांगतो सर्वांना... 
अविश्वासांनं गळा कापताना समशेर असते भरोश्याच्याच हाती...! 
-संतोष लक्ष्मण जाधव.

©Santosh Jadhav #आयुष्याचं पुस्तक लिहीताना.. Vinod Ganeshpure Sewli Karmakar Divya Joshi Madhavi Choudhary