Nojoto: Largest Storytelling Platform

रेशीम धागा.. --------------------- तुझ्या माझ्या प

रेशीम धागा..
---------------------
तुझ्या माझ्या प्रीतीचे
हे बंध रेशमाचे
गाठी जुळून आल्या
हे नात आयुष्याचे

सजले घरदार
चांदणे पोर्णिमेचे
शालू भरजरी ग
स्वप्न नव्या प्रीतीचे

ते ठेंगणे आभाळ
वाटे डोळ्यात तुझ्या
बिलगून भावना
तूच हृदयी माझ्या

सुखदुःखात सखे
तू मज सावरावे
देऊन हात हाती
हे आयुष्य चालावे

काटेरी नव्या वाटा
चालता येतीजाती
संसाराचं तोरण
तू विनावे सोबती

इच्छा दोन जीवांच्या
जानुया सोबतीने
संसाराच्या गाड्यात
स्वप्न नवेतराने

सुखदुःख दोघांचे
ओंजळीत ठेऊया
बांधू रेशमी धागा
हे आयुष्य चालूया

----------------------
@अविनाश लाड,राजापूर-हसोळ रेशीमधागा
रेशीम धागा..
---------------------
तुझ्या माझ्या प्रीतीचे
हे बंध रेशमाचे
गाठी जुळून आल्या
हे नात आयुष्याचे

सजले घरदार
चांदणे पोर्णिमेचे
शालू भरजरी ग
स्वप्न नव्या प्रीतीचे

ते ठेंगणे आभाळ
वाटे डोळ्यात तुझ्या
बिलगून भावना
तूच हृदयी माझ्या

सुखदुःखात सखे
तू मज सावरावे
देऊन हात हाती
हे आयुष्य चालावे

काटेरी नव्या वाटा
चालता येतीजाती
संसाराचं तोरण
तू विनावे सोबती

इच्छा दोन जीवांच्या
जानुया सोबतीने
संसाराच्या गाड्यात
स्वप्न नवेतराने

सुखदुःख दोघांचे
ओंजळीत ठेऊया
बांधू रेशमी धागा
हे आयुष्य चालूया

----------------------
@अविनाश लाड,राजापूर-हसोळ रेशीमधागा
avinashlad4153

Avinash lad

New Creator