Nojoto: Largest Storytelling Platform

*अंतराच्या मनःदर्पणी* *बिंब स्वतःचे खर

*अंतराच्या मनःदर्पणी*
            *बिंब स्वतःचे खरे उमटले*
*अवशेषांचे भग्न मंदिर*
         *किती मुखवटे गळून गेले..*

*क्षणा -क्षणाला रूप पालटे*
             *रंग बदलतो चालीने* 
 *पाय चाटतो श्वान बिचारा* 
            *लाळ घोटतो सोयीने..* 

 *भुलले सारे वरल्या रंगा* 
             *भाव आता मोल नाही* 
 *सरळ चालते नदी कितीही* 
              *पाणी मात्र वक्र जायी..* 

 *सदा दावते उपजत वृत्ती* 
             *दर्पण,आईना इतरांना* 
 *कुणी दावता स्वतः आरसा* 
             *ठेच लागते सन्माना..* 

 *कधी पृथा ना दर्पण बोले* 
             *लख्ख वदते सदैव वाचा* 
 *गुण-दोषासह ग्रहण करावे* 
        *नच असावा एकची साचा..* 

 *आरसपाणी सौंदर्याची* 
           *एक खूण जरी नसे तुला* 
 *निर्मळ अंतर गंगेचे जळ* 
          *मदन सावळा तोच मला..*

©Shankar Kamble #AWritersStory #आरसा #दर्पण #आरसा #आईना #मन #अंतर्मन #खरं #सत्य
*अंतराच्या मनःदर्पणी*
            *बिंब स्वतःचे खरे उमटले*
*अवशेषांचे भग्न मंदिर*
         *किती मुखवटे गळून गेले..*

*क्षणा -क्षणाला रूप पालटे*
             *रंग बदलतो चालीने* 
 *पाय चाटतो श्वान बिचारा* 
            *लाळ घोटतो सोयीने..* 

 *भुलले सारे वरल्या रंगा* 
             *भाव आता मोल नाही* 
 *सरळ चालते नदी कितीही* 
              *पाणी मात्र वक्र जायी..* 

 *सदा दावते उपजत वृत्ती* 
             *दर्पण,आईना इतरांना* 
 *कुणी दावता स्वतः आरसा* 
             *ठेच लागते सन्माना..* 

 *कधी पृथा ना दर्पण बोले* 
             *लख्ख वदते सदैव वाचा* 
 *गुण-दोषासह ग्रहण करावे* 
        *नच असावा एकची साचा..* 

 *आरसपाणी सौंदर्याची* 
           *एक खूण जरी नसे तुला* 
 *निर्मळ अंतर गंगेचे जळ* 
          *मदन सावळा तोच मला..*

©Shankar Kamble #AWritersStory #आरसा #दर्पण #आरसा #आईना #मन #अंतर्मन #खरं #सत्य