Unsplash शेताच्या त्या बांधावर माझं कुडाच ते घर स्वर्गालाही लाजवील ऐस माझ घरदार माय शोभे चुल्ह्या पाशी जैसी रखुमायी वाणी, बाप माझा पुंडलिक करी सुखाची पेरणी ऐसा संसार संसार नाही आनंदाला पार, स्वर्गालाही लाजवील ऐस माझं घरदार नाही कधी ताटातूट माझ्या माय नी बापाची, बाप जरी तो कठोर माय हळव्या मनाची नसे पैसा जरी हाती, तरी केल सपान ते पूर घाम गाळून बापानं शेत पीकविल सार घरोघरी असतात बाई मातीच्या गं चुली, लेक करता घरचा, परक्याच धन मुली कष्टा परिस ना वाट, शेतकऱ्याच्या घराला लेकराच्या सुखासाठी बाप स्वतः जुपे नांगरला ऐसा सोन्याचा संसार मला दाखवा जी बर स्वर्गालाही लाजवील ऐस माझं घरदार ©Narendra Vyawhare #Book मराठी कविता प्रेमाच्या मराठी कविता प्रेम मराठी कविता प्रेम मराठी कविता संग्रह प्रेरणादायी कविता मराठी