Nojoto: Largest Storytelling Platform

#बाप्पा_माझा 🙏❤️🏡 कधी सुटेल हा तिढा कधी संपेल

#बाप्पा_माझा 🙏❤️🏡

कधी सुटेल हा तिढा 
कधी संपेल हा लढा 
कोंडून साऱ्याणा कुठे ठेवली तू चावी.. 
दिसे ना तू देवळात देवा 
गेला कुठल्या गावी 
घर खायला उठते 
घर खायला मागते 
दिवस छळतो प्रहरभर 
रात्र पहाटभर जागते  
हातावरच्या पोटानी 
लावावी आस कुणाकडे 
चिऊ काऊचे मागावे घास कुणाकडे 
हे कसले प्रारब्ध 
झाली दुनिया सारी स्तब्ध 
कोणता विषाणू ने 
आणली ही कोणती परिस्थिती 
काय सांगू मनोमनी दाटली कसली भीती.. 
घे माय बापा चूक भूल पोटात लेकरांची... 
घेऊ दे पुन्हा हवेत एकदा गगन भरारी 
तूच कर्ता करविता आम्ही 
कोण सांगणार हक्‍क 
दाखव करून अशक्य ते शक्य 
समजले मानवजातीला 
काय योग्य काय अयोग्य 
दे बळ पुन्हा लढायला 
दे सर्वा उत्तम आरोग्य #lockdown3
#बाप्पा_माझा 🙏❤️🏡

कधी सुटेल हा तिढा 
कधी संपेल हा लढा 
कोंडून साऱ्याणा कुठे ठेवली तू चावी.. 
दिसे ना तू देवळात देवा 
गेला कुठल्या गावी 
घर खायला उठते 
घर खायला मागते 
दिवस छळतो प्रहरभर 
रात्र पहाटभर जागते  
हातावरच्या पोटानी 
लावावी आस कुणाकडे 
चिऊ काऊचे मागावे घास कुणाकडे 
हे कसले प्रारब्ध 
झाली दुनिया सारी स्तब्ध 
कोणता विषाणू ने 
आणली ही कोणती परिस्थिती 
काय सांगू मनोमनी दाटली कसली भीती.. 
घे माय बापा चूक भूल पोटात लेकरांची... 
घेऊ दे पुन्हा हवेत एकदा गगन भरारी 
तूच कर्ता करविता आम्ही 
कोण सांगणार हक्‍क 
दाखव करून अशक्य ते शक्य 
समजले मानवजातीला 
काय योग्य काय अयोग्य 
दे बळ पुन्हा लढायला 
दे सर्वा उत्तम आरोग्य #lockdown3