तुम्हीच ठरवा.... तुम्ही च ठरवा आता रामराज्य म्हणजे नेमक काय असत भरकटून धर्माच्या नावाखाली अर्धर्माची कृत्य करायची ? की सत्याच्या कास धरून धर्मनिपेक्षतेचे पाझर फोडायचे तुम्ही च ठरवा आता या राष्ट्रात राम कोण नी रावण कोण ? राजनीती युद्धभूमीत कोण चिरडतय आपले हक्क काळानुसार सर्वच काही बदलते पण सदसद विवेक बुध्दीने असे सर्वा मग या दुपट्टी नितीस का भरकाटायचे ? तुम्ही च ठरवा आता नेमक काय करायचं गेले परके परि आपल्याच गुलामगिरीत अडकलो राहायचं असच खितपत पडून हातावर हात धरून की स्वतंत्र्यसंग्रामापरी पेटून उठून करायची का एकदा साम्राज्यशाही विरोधी क्रांती ? खरच टिकेल का आपली लोकशाहीची ही चळवळ..? तुम्हीच ठरवा.... ©Jaymala Bharkade #politicalsatire