@गझल @ आयुष्य पेलतांना दुःखास झेलताना वणव्यात गारवा तू शून्यास व्यापताना माझ्याच सावलीने साथ सोडली कितीदा झळ सोसली उन्हाची माझ्यात गुंतताना वाट्यास ना कधी आले दान सुगंधी फुलाचे स्मरते मला तशी तू काट्यास वेचताना ओसाड भग्न लेणी अवशेष हे लयाचे माळलेस उन्मेष रंग हळुवार फुंकताना एकरूप देह गात्र अस्तित्व ना स्वतःचे वेदनेचे गीत केले लोकांस सांगताना जपले मला उरी तू शिंपल्यातला मोती कवडीमोल नगाचे भाव अमूल्य करताना ©Shankar Kamble #गजल #आयुष्य_जगताना #जीवनअनुभव #सत्य #प्रेम #प्रेमकवि #विरह #गझल #Saffron