Nojoto: Largest Storytelling Platform

*विषय:-मज वेध लागले* ************************* धर

*विषय:-मज वेध लागले*

*************************
धरतीला हि आस
आता रे तुझ्या *मिलनाची,*
मज वेध लागले
पावसाच्या *जलधारांची.*

मज वेध लागले
मातीचा सुगंध *घेण्याचे,*
पहिल्या पावसात
मनसोक्त ते *भिजण्याचे.*

मज वेध लागले
हिरव्यागार *शृंगाराचे,*
निसर्गाचा सोहळा
डोळे भरून *पहाण्याचे.*

मज वेध लागले
ऊन पावसाच्या *खेळाचे,*
सृष्टीच्या सोहळ्यात
आनंदाने *बागडायचे.*

मज वेध लागले
इंद्रधनू *रंगाचे,*
निरभ्र आकाशात
पक्षी बनून *उडण्याचे.*
------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke वेध निसर्गाचा
*विषय:-मज वेध लागले*

*************************
धरतीला हि आस
आता रे तुझ्या *मिलनाची,*
मज वेध लागले
पावसाच्या *जलधारांची.*

मज वेध लागले
मातीचा सुगंध *घेण्याचे,*
पहिल्या पावसात
मनसोक्त ते *भिजण्याचे.*

मज वेध लागले
हिरव्यागार *शृंगाराचे,*
निसर्गाचा सोहळा
डोळे भरून *पहाण्याचे.*

मज वेध लागले
ऊन पावसाच्या *खेळाचे,*
सृष्टीच्या सोहळ्यात
आनंदाने *बागडायचे.*

मज वेध लागले
इंद्रधनू *रंगाचे,*
निरभ्र आकाशात
पक्षी बनून *उडण्याचे.*
------------------------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
  -- नारायणगाव, पुणे.

©Rajendrakumar Shelke वेध निसर्गाचा

वेध निसर्गाचा #Shayari