Nojoto: Largest Storytelling Platform

कुठे शोधशी लख्ख पाऊले अलगद होते ठसे उमटले घुटमळणा

कुठे शोधशी लख्ख पाऊले 
अलगद होते ठसे उमटले
घुटमळणारी सावली स्वतःची
वळुन मागे तिला पाहिले

चालत चालत वाट काढली
धुसट पाऊले दिसु लागली 
प्रेमाच्या ह्या अवखळ वाटेत 
प्रेयसी मजला तिथे दिसली

पाहत गेलो पुढे जरासा
कुणीच मजला दिसले नाही 
हा लपंडाव आहे माझ्यासवे 
मग असेच वाटले काही

नाहिसे होणे तुझे असे हे
सारखे मज छळत राहते
दिसूनही तु पुन्हा पुन्हा 
कुठे नकळत लपून बसते

तु माझ्या जरा जवळ येता 
तुझा हात मी हातात घेता 
चुकून कळले मलाही सारे
हा भास आभासांचा खेळ होता

                     ~ विलास भोईर 
                     ( भास आभासांचा खेळ ) भास आभासांचा खेळ!
कुठे शोधशी लख्ख पाऊले 
अलगद होते ठसे उमटले
घुटमळणारी सावली स्वतःची
वळुन मागे तिला पाहिले

चालत चालत वाट काढली
धुसट पाऊले दिसु लागली 
प्रेमाच्या ह्या अवखळ वाटेत 
प्रेयसी मजला तिथे दिसली

पाहत गेलो पुढे जरासा
कुणीच मजला दिसले नाही 
हा लपंडाव आहे माझ्यासवे 
मग असेच वाटले काही

नाहिसे होणे तुझे असे हे
सारखे मज छळत राहते
दिसूनही तु पुन्हा पुन्हा 
कुठे नकळत लपून बसते

तु माझ्या जरा जवळ येता 
तुझा हात मी हातात घेता 
चुकून कळले मलाही सारे
हा भास आभासांचा खेळ होता

                     ~ विलास भोईर 
                     ( भास आभासांचा खेळ ) भास आभासांचा खेळ!
vilasbhoir5205

Vilas Bhoir

New Creator