Nojoto: Largest Storytelling Platform

तुझे उत्तर तयार आहे माझा प्रश्न अजून नाही शब्दाला

तुझे उत्तर तयार आहे
माझा प्रश्न अजून नाही

शब्दाला सार्थ अर्थ आहे
बेअर्थ प्रश्न माझा नाही

सरता वेळ किती जातो
परतीचा वेळ येत नाही

अधोरेखित करून ठेवले सारे
महत्वाचे काही उरले नाही

शब्दांना कैक लावून दिले
एक नि दोन राहिले नाही

द्वंद्व उमटून फिकट झाला
तुला आता तो दिसणार नाही

कुठल्या विश्वात तू आहे
मला जाण अजून नाही


@kavi_graj #असणे साधे काय होते
तुझे उत्तर तयार आहे
माझा प्रश्न अजून नाही

शब्दाला सार्थ अर्थ आहे
बेअर्थ प्रश्न माझा नाही

सरता वेळ किती जातो
परतीचा वेळ येत नाही

अधोरेखित करून ठेवले सारे
महत्वाचे काही उरले नाही

शब्दांना कैक लावून दिले
एक नि दोन राहिले नाही

द्वंद्व उमटून फिकट झाला
तुला आता तो दिसणार नाही

कुठल्या विश्वात तू आहे
मला जाण अजून नाही


@kavi_graj #असणे साधे काय होते