Nojoto: Largest Storytelling Platform

चिऊताई चिऊताई ------------------------------------

चिऊताई चिऊताई
------------------------------------------
अगं चिऊताई चिऊताई तू गेली कुठं
असं अंगणातलं दानं सोडून इथं
शहर झालं गाव माझं कळतंय मला
पण तुझ्या विना घर माझं सळतंय मला

एक वेळ तू तुझ्या माहेरा येऊन जा
जुनं तुझं घरटं तू पाहून जा
तुझा छताचा तो खोपा मी जपलाय गं
तुझा तो रुसवा मला कळलाय गं

सिमेंटाचे वाडे बंगले फोफावले
तुझे घर तुझं कडून हिसकावले
दोषी तुझा मी एक माणूस हाय
बनावटीच्या जगात माझे रौलेत पाय

चिऊताई चिऊताई परत येशील ना
पहाटेचं गाणं गोड गाशील ना
वाट तुझी आई माझी पाहतेय गं
कुठे गेली मैना माझी पुसतेय गं

आई माझी थोर मोठी जुन्या गाव प्रथेची
तुझ्या साठी निगा राखे अंगणाची
नव्या माझ्या पिढीसाठी येऊ नको तू
तुझ्या लाडाच्या आई साठी येगं तू
चिऊताई चिऊताई येगं तू...

©yusuf sayyad जागतिक चिमणी दिवस
#निसर्गसंवर्धन
चिऊताई चिऊताई
------------------------------------------
अगं चिऊताई चिऊताई तू गेली कुठं
असं अंगणातलं दानं सोडून इथं
शहर झालं गाव माझं कळतंय मला
पण तुझ्या विना घर माझं सळतंय मला

एक वेळ तू तुझ्या माहेरा येऊन जा
जुनं तुझं घरटं तू पाहून जा
तुझा छताचा तो खोपा मी जपलाय गं
तुझा तो रुसवा मला कळलाय गं

सिमेंटाचे वाडे बंगले फोफावले
तुझे घर तुझं कडून हिसकावले
दोषी तुझा मी एक माणूस हाय
बनावटीच्या जगात माझे रौलेत पाय

चिऊताई चिऊताई परत येशील ना
पहाटेचं गाणं गोड गाशील ना
वाट तुझी आई माझी पाहतेय गं
कुठे गेली मैना माझी पुसतेय गं

आई माझी थोर मोठी जुन्या गाव प्रथेची
तुझ्या साठी निगा राखे अंगणाची
नव्या माझ्या पिढीसाठी येऊ नको तू
तुझ्या लाडाच्या आई साठी येगं तू
चिऊताई चिऊताई येगं तू...

©yusuf sayyad जागतिक चिमणी दिवस
#निसर्गसंवर्धन
yusufsayyad8216

yusuf sayyad

New Creator