गाव माझ्या स्वप्नात, माझ्या विश्वात माझा सुंदरसा होता गाव वाहणाऱ्या नदीचं पाणी त्यात अपुली छोटी नाव गावातील कच्चे रस्ते ज्यावर घेतली होती धाव सायकलचे फिरते चाक गोट्या, भवऱ्यांचा सुंदर डाव लंगडीत होती मजा अन पकडापकडीत ही मजा होती सुंदर ते गाव आठवता डोळ्यांच्या कडांवर आले मोती - मनिष ज्ञानदेव कानडे, पुणे ©Manish Kanade #arnav #Trees