Nojoto: Largest Storytelling Platform

सूर... पाडवा आला दसरा आला सुरु होते साफ सफाई... मग

सूर...
पाडवा आला दसरा आला
सुरु होते साफ सफाई...
मग बाईच्या जीवाची फक्त 
कामाने उडते नुसती घाई
अंथरूने धुवा ठेवणीतली
भांडी घेतात घासायला
उसंत मिळते कुठे तिला
मग क्षणभर बसायला
कोपरा कोपरा करते
सर्व ती मनापासून साफ
मधूनच आठवते तरतरी
आणणाऱ्या चहाची वाफ
पण तरीही प्रश्न पडतोच ना 
घरातील जळमटे होतील दूर
पण मनांच्या जळमटांच काय ?
त्यांच्याशी कधी जुळतील सूर...

©शब्दवेडा किशोर #स्रीम्हणूनजगताना
सूर...
पाडवा आला दसरा आला
सुरु होते साफ सफाई...
मग बाईच्या जीवाची फक्त 
कामाने उडते नुसती घाई
अंथरूने धुवा ठेवणीतली
भांडी घेतात घासायला
उसंत मिळते कुठे तिला
मग क्षणभर बसायला
कोपरा कोपरा करते
सर्व ती मनापासून साफ
मधूनच आठवते तरतरी
आणणाऱ्या चहाची वाफ
पण तरीही प्रश्न पडतोच ना 
घरातील जळमटे होतील दूर
पण मनांच्या जळमटांच काय ?
त्यांच्याशी कधी जुळतील सूर...

©शब्दवेडा किशोर #स्रीम्हणूनजगताना