Nojoto: Largest Storytelling Platform

गणिताचं आपलं बरंय कोणाला काहीतरी माना एक दोघांचा व

गणिताचं आपलं बरंय कोणाला काहीतरी माना
एक दोघांचा वापर करून तिसऱ्याला शोधा 
प्रश्नांच्या जगात उत्तरांचे डोंगर खोदा..

खोदताना केलेल्या प्रयत्नांना आणि वापरलेल्या माणसांना एकदा मोजा.

मोजणं आलंच तर पुन्हा गणितही आलं,
एकमेकांचा वापर करण्याचा नादात मानलेलं पण बुडालं,

गणितं असतातच फसवी,
x शोधण्याच्या धावपळीत सूत्रांची मात्र लपवा छपवी..

प्रश्न सोडवताना नको त्या पायऱ्यांची होते फरफट,
मग सुरू होते मूळ संकल्पनांची करामत..

मग मूळ प्रश्न राहतो बाजूलाच नुसताच अंकांचा बाजार,
 मानलेल्या x चा पुन्हा करूया विचार..

बाजार मांडलाच आहे तर x ला पण विकुया,
नाहीतर मानलेलाच आहे त्याचा पण लिलाव करूया..

या सगळ्या झटापटीत वेळ निघून जातो,
मानलेल्या x  च्या किंमतीचा प्रश्न तसाच उरतो..

                 ---Mantri_says. #गणित...