पाऊस आला की असच होणार हातातली कामं बाजूला पडणार मन चिंब चिंब होणार आणि अंग अंग भिजणार पावसात भिजतांना गफलत होणार कोणी मनसोक्त भिजून हसणार तर कोणी मनातलं दुःख त्या बेधुंद पावसात वाहणार मग चहाची तलब लागणार त्या सोबत भजी मागणार टेबलावरचा वाफळलेला चहा जुन्या आठवणीत न्हेणार मग रेडिओवर गाणं वाजणार आणि नेमकं ते आवडीचं असणार मन जरा विचलित होणार आणि एका एक डोळे भरणार थोडा वेळ आठवणींचे ढग दाटणार डोळयातून मुसळधार पाऊस पडणार मग छपरावरून पडणाऱ्या थेंबांना तुम्ही तळ हातावर झेलणार अचानक पाऊस थांबणार मन हलकं हलकं होणार दीर्घ श्वास घेऊन…. तुम्ही शांतपने बसणार क्षणात शांतता पसरणार आणि मग आठवणींची भुतं …….. तुम्हाला घेरणार पाऊस आला की असच होणार - राशि rakeshkavita.blogspot.in ©Rashi पाऊस आला की असच होणार #marathikavita #marathipoem #marathipoetry #NojotoPune #NojotoMarathiKavita #Paaus #themb