Nojoto: Largest Storytelling Platform

बटाट्याची भाजी करताना मी निष्पाप लेकरू पहिली वेळ ह

बटाट्याची भाजी करताना
मी निष्पाप लेकरू
पहिली वेळ होती म्हणून
पाककला लागलो पोखरू (१)
यूट्यूब वरचा रेसिपी विडिओ
निवांत पाहून झालं
आईला फोन करून
उकडायचं कसं विचारलं (२)
मंद आचेवरती बटाटे
पाण्यात ठेवले उकडायला
दुसऱ्या वाती वरती
चपात्या घेतल्या करायला (३)
चेहऱ्यावरच्या घामामुळे
तीनदा तोंड धुवून आलो
दोन कांदे आणि हिरव्या मिरच्यांमुळे
तीनदा रडून रडून आलो (४)
झालेल्या तुटक्या चपात्यांमुळे
आधीच रागात होतो
मोहरी तडतडल्यावर मात्र
कांदे मिरच्या पाहत होतो (५)
अर्धा किलो बटाट्यांच्या
अत्याचारासाठी तुला
आम्हीच भेटलो होतो का
असं ते विचारत होते मला (६)
कितीही मीठ टाकलं तरी
चव काही आली नाही
पाककलेच्या प्रवासात, मला गती आली नाही(७)  - ओंकार रणवीरकर #बटाटे #cooking #21dayslockdown  #बटाट्याचीभाजीकरताना #yqtaai #marathikavita #potato #मराठीकविता
बटाट्याची भाजी करताना
मी निष्पाप लेकरू
पहिली वेळ होती म्हणून
पाककला लागलो पोखरू (१)
यूट्यूब वरचा रेसिपी विडिओ
निवांत पाहून झालं
आईला फोन करून
उकडायचं कसं विचारलं (२)
मंद आचेवरती बटाटे
पाण्यात ठेवले उकडायला
दुसऱ्या वाती वरती
चपात्या घेतल्या करायला (३)
चेहऱ्यावरच्या घामामुळे
तीनदा तोंड धुवून आलो
दोन कांदे आणि हिरव्या मिरच्यांमुळे
तीनदा रडून रडून आलो (४)
झालेल्या तुटक्या चपात्यांमुळे
आधीच रागात होतो
मोहरी तडतडल्यावर मात्र
कांदे मिरच्या पाहत होतो (५)
अर्धा किलो बटाट्यांच्या
अत्याचारासाठी तुला
आम्हीच भेटलो होतो का
असं ते विचारत होते मला (६)
कितीही मीठ टाकलं तरी
चव काही आली नाही
पाककलेच्या प्रवासात, मला गती आली नाही(७)  - ओंकार रणवीरकर #बटाटे #cooking #21dayslockdown  #बटाट्याचीभाजीकरताना #yqtaai #marathikavita #potato #मराठीकविता