#OpenPoetry पुन्हा पुन्हा प्रेमात पडावे मन हिंदोळ्यावर पुन्हा झुलावे अवकाशाच्या निळाइतुनी पुलपंखांचे सडे पडावे अलगद येता खट्याळ वारा मुक्तपणे स्वप्ने पसरावे नानाविध या रंगांच्या लाटा सूर मनीचे छेडत जावे - मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#