Nojoto: Largest Storytelling Platform

नाही इथे कोणी कुणाचा खेळ होई फक्त मनाचा तोंडावरती

नाही इथे कोणी कुणाचा
खेळ होई फक्त मनाचा
तोंडावरती गोड बोलुनी
चाले डाव हा नेहमीचा

सुखाचे होती सारे सोबती
दुःखात असता विसरून जाती
खऱ्या खोट्या सहाऱ्याची तेव्हा
लोक जाणीव करून देती

कठीण प्रसंग येता समोर
सगळेच दूर पळून जाती
फुकटचे सल्ले देण्यासाठी
तोंडाची पट्टी चालू ठेवती

निसटून जाता पैसा सारा
चेहरे खरे दिसू लागती
पंगतीत बसून जेवणारे ही
ताटात उष्ट वाढून जाती

नको कुणाची मदत आता
नको कुणाचे उपकार
जीवनाच्या कसोटीवर
चल मारू हिंमतीने षटकार #nojoto#nojotoapp#nojotonarathi#marathikvita#nojotohindi#nojotomarathi#poem
नाही इथे कोणी कुणाचा
खेळ होई फक्त मनाचा
तोंडावरती गोड बोलुनी
चाले डाव हा नेहमीचा

सुखाचे होती सारे सोबती
दुःखात असता विसरून जाती
खऱ्या खोट्या सहाऱ्याची तेव्हा
लोक जाणीव करून देती

कठीण प्रसंग येता समोर
सगळेच दूर पळून जाती
फुकटचे सल्ले देण्यासाठी
तोंडाची पट्टी चालू ठेवती

निसटून जाता पैसा सारा
चेहरे खरे दिसू लागती
पंगतीत बसून जेवणारे ही
ताटात उष्ट वाढून जाती

नको कुणाची मदत आता
नको कुणाचे उपकार
जीवनाच्या कसोटीवर
चल मारू हिंमतीने षटकार #nojoto#nojotoapp#nojotonarathi#marathikvita#nojotohindi#nojotomarathi#poem