Nojoto: Largest Storytelling Platform

कारागृही तू घेतलासे जन्म बाहेर वरुणाचे मन ते उद्वि

कारागृही तू घेतलासे जन्म
बाहेर वरुणाचे मन ते उद्विग्न
शेषाने धरिले छत्र तुझ्या डोईवरी
रे कृष्णा कृपा करी जगतावरी....

कारागृही जन्मला, गोकुळात वाढला
देव असुनी तू गोकुळात रमला
गोपगोपिकांसवे ताव लोण्यावर मारी
रे कृष्णा कृपा करी जगतावरी.....

केल्या बालक्रीडा तू वृंदावनी
मारुनी पुतनेला धाडीले यमसदनी
केले मृत्यू तांडव त्या कालिया शिरी
रे कृष्णा कृपा करी जगतावरी....

वधिले तू त्या चाणूर-कंसास
ज्यांचा त्रास भारी जगतास
संपविले कंसा प्रहारुनी छातीवरी
रे कृष्णा कृपा करी जगतावरी....

महाभारती करुनी सारथ्य अर्जुनाचे
दिधले तू ज्ञान तयास गीतेचे
न्याय केला पांडवांचा, संपविले कौरवांसी
रे कृष्णा कृपा करी जगतावरी....
©✒️सारंग #krishna
कारागृही तू घेतलासे जन्म
बाहेर वरुणाचे मन ते उद्विग्न
शेषाने धरिले छत्र तुझ्या डोईवरी
रे कृष्णा कृपा करी जगतावरी....

कारागृही जन्मला, गोकुळात वाढला
देव असुनी तू गोकुळात रमला
गोपगोपिकांसवे ताव लोण्यावर मारी
रे कृष्णा कृपा करी जगतावरी.....

केल्या बालक्रीडा तू वृंदावनी
मारुनी पुतनेला धाडीले यमसदनी
केले मृत्यू तांडव त्या कालिया शिरी
रे कृष्णा कृपा करी जगतावरी....

वधिले तू त्या चाणूर-कंसास
ज्यांचा त्रास भारी जगतास
संपविले कंसा प्रहारुनी छातीवरी
रे कृष्णा कृपा करी जगतावरी....

महाभारती करुनी सारथ्य अर्जुनाचे
दिधले तू ज्ञान तयास गीतेचे
न्याय केला पांडवांचा, संपविले कौरवांसी
रे कृष्णा कृपा करी जगतावरी....
©✒️सारंग #krishna